महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलानी, कोटियान यांची अर्धशतके

06:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनंतपूर : 2024 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या अन्य एका सामन्यात मुलानी आणि कोटियान यांच्या अर्धशतकामुळे इंडिया अ संघाने 82 षटकांत पहिल्या डावात 8 बाद 288 धावा जमविल्या. इंडिया ड तर्फे व्ही. कविरप्पा आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. इंडिया अ संघातील अष्टपैलु मुलानीने 174 चेंडूत नाबाद 88 धावा जमविताना तनुष कोटियानसमवेत 91 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी इंडिया अ ची स्थिती 5 बाद 93 अशी केविलवाणी झाली होती. मयांक अगरवाल 7, प्रथम सिंग 7 धावांवर बाद झाले. रियान परागने 29 चेंडूत 37 धावा जमविल्या. तिलक वर्माने 10 धावा केल्या. पहिल्या दिवशीचा खेळ संपण्यास 15 मिनीटे बाकी असताना कोटियान झेलबाद झाला. कविरप्पा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

Advertisement

संक्षिप्त धावफलक -इंडिया अ प. डाव: 82 षटकात 8 बाद 288 (मुलानी खेळत आहे 88, कोटियन 53, हर्षित राणा 2-49, व्ही. कविरप्पा 2-30, अर्शदीप सिंग 2-73)

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article