महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शमीचा किलर लूक, नवी हेअर स्टाईल तुफान चर्चेत

06:15 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोशल मीडियावर नवा लूक व्हायरल : हेअरस्टाईलसाठी मोजले लाखो रुपये

Advertisement

लखनौ, नोएडा

Advertisement

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा नवा लूक समोर आला आहे. शमीने काही दिवसापूर्वी हेअर ट्रान्सप्लांट केले होते, यानंतर त्याच्या केसांमध्ये एक वेगळीच चमक दिसून आली. विशेष म्हणजे, शमीने नुकतेच सोशल मीडियावर फ्रेश हेयरकटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याचा लूक अप्रतिम दिसत आहे. सध्या शमी त्याच्या हेअरस्टाईलमुळे सोशल मीडियासह सर्वत्र चर्चेत आहे.

गतवर्षी भारतात झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान शमीच्या डोक्यावर खूपच कमी केस दिसत होते. यानंतर काही महिन्यांपूर्वी त्याने हेअर ट्रान्सप्लांट केले होते, ज्यामुळे आता त्याच्या डोक्यावर दाट केस आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील प्रसिद्ध केशरचनाकार अलीम हकीम यांच्याकडे शमीने हा नवा लूक केला आहे. हकीम हे भारतातील प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट म्हणून ओळखले जातात. टीम इंडियातील अनेक खेळाडूंची हेअरस्टाईल हकीम यांनी सेट केली आहे. दरम्यान, नव्या हेअरस्टाईलमधील आपले फोटो शमीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचा हा नवा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला पडला आहे.

मागील काही महिन्यापासून दुखापतीमुळे बाहेर असलेला शमी आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो सध्या सराव करत आहे. आगामी बांगलादेश किंवा न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो पुनरागमनासाठी प्रयत्नशील असणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article