रश्मिकाच्या त्या व्हिडिओवर अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली नाराजी; पहा काय म्हणाले बिग बी
सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओवर अभिनेता अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. व्हिडिओमध्ये एक महिला काळ्या रंगाचा पोशाख परिधान करून लिफ्टमध्ये शिरताना दिसत आहे. तिचा चेहरा रश्मिका मंदानासारखा दिसेल अशा प्रकारे मॉर्फ आणि एडिट केला गेला आहे. इंटरनेटवरील अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. तसेच इंटरनेटवर "चुकिची माहीती" वेगाने पसरवणाऱ्यावर कायदेशील कारवाई केली गेली पाहीजे असेही म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ पुन्हा पोस्ट करून अशा गोष्टींवर कायदेशीर कारवाई केली गेली पाहीजे असे मत व्यक्त केले.
एका ब्रिटीश- भारतीय महीलेचा हा मुळ व्हिडीओ असून झारा पटेल असे तीचे नाव आहे. तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असून सारा पटेल यांनी 9 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये ती महिला काळ्या रंगाचा स्विम सूट परिधान करून एका लिफ्टमध्ये शिरत आहे. व्हिडिओमध्ये फेरफार करून त्यावर रश्मिका मंदाना या अभिनेत्रीचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी पाहणाऱ्याला ती अभिनेत्री रश्मिका मंदानाच वाटत आहे. नविन आलेल्या डिपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडिओ मॉर्फ करण्यात आला आहे.
दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ आपल्या एक्स (ट्विटर) या अकाउंटवर रिट्विट करून अशा प्रकारचे व्हिडीओ कोणाच्याही संमतीशिवाय मॉर्फ करणे हे चुकिचे असल्याचे सांगून त्यावर गुन्हा दाखल झाला पाहीजे असे मत व्यक्त केले. केंद्रिय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डीप फेक हे लेटेस्ट तंत्रज्ञान असून खूप धोकादायक आणि हानीकारक आहे. त्यामुळे चुकीची माहिती पसरवण्याच्या बाबतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे हे योग्य पद्धतीने हाताळले जाणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. अनेक लोकांनी अशा प्रकारच्या मॉर्फ केलेल्या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे.