बंगाल संघात शमीचा समावेश
वृत्तसंस्था / कोलकाता
आगामी होणाऱ्या सय्यद मुस्ताकअली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी बंगाल संघाची घोषणा करण्यात आली असून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा या संघात समावेश करण्यात आला आहे. 2025-26 च्या रणजी क्रिकेट हंगामातील पहिल्या चार सामन्यात शमीने बंगाल संघाचे प्रतिनिधीत्व करताना 20 गडी बाद केले होते. पण त्यानंतर तंदुरुस्तीच्या समस्येवरुन त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागली. पायाला झालेल्या दुखापतीतून तो आता तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याची मुस्ताकअली चषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शमीने रणजी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत 15 गडी बाद केले होते. त्याच्या कामगिरीमुळे बंगाल संघाने उत्तराखंड आणि गुजरात यांचा पराभव करत क गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
बंगाल संघाचे नेतृत्व अभिमन्यू इश्वरणकडे सोपविण्यात आले आहे. बंगालच्या 17 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आले असून आकाश दीपलाही संधी देण्यात आली आहे. मुस्ताकअली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील बंगालचा पहिला सामना बडोदा संघाबरोबर 26 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत बंगालचा क गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात पंजाब, हिमाचलप्रदेश, सेनादल, पुडुचेरी आणि हरियाणा यांचाही सहभाग आहे.
बंगाल संघ: अभिमन्यू ईश्वरण (कर्णधार), सुदीप घरमी, अभिषेक पोरल, शकील गांधी, युवराज केसवानी, प्रियांशी श्रीवास्तव, शहबाज अहमद, पी. प्रामाणिक, डब्ल्यू चटर्जी, करण लाल, सक्षम चौधरी, मोहम्मद शमी, आकाश दीप, सायन घोष, कनिष्क शेट, युधजित गुहा आणि श्रेयन.