Satara News: आता दुर्ग पर्यटनाला वेग येणार, पर्यटनमंत्री Shambhuraj Desai यांची ग्वाही
प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम पहिल्या टप्यात सुरु केलेले आहे
सातारा : युनिस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्यांचा समावेश जागतिक वारसास्थळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरचे पर्यटक गडकिल्ले पाहण्यासाठी येणार आहेत. त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे.
मी पर्यटन विभागाचा पदभार स्वीकारताना गडकिल्ले पर्यटनांच्या आराखड्याचे पहिल्या टप्याचे काम सुरु करण्यात आले होते. ते काम लवकरच पूर्ण होईल, तसेच प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम चांगल्या दर्जाचे ऐतिहासिक असे करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन व खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, पन्हाळ्यावरील एमटीडीसीच्या रिसॉर्टचे उद्घाटन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या यांच्या हस्ते करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शिवतीर्थ येथे छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन जल्लोष करण्यात आला.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज जागतिक पातळीवर 12 गडकिल्यांचा समावेश झाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जे भारतात पर्यटनासाठी, इतिहास अभ्यास करण्यासाठी येतात. अशा सगळयांनाच गडकिल्याचे महत्व समजणार आहे. जे आजपर्यत जागतिक पातळीवर जावू शकले नव्हते.
ते या निर्णयामुळे जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याच्यासाठी राज्य सरकारने आणि सांस्कृतिक व पर्यटन विभागाने खूप प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पाटील या सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत आणि विशेष आभार मानले पाहिजेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इतर देश युनिस्कोच्या मतदान प्रक्रियेत आहेत. त्या देशाच्या राजदुतांच्या बरोबर त्या देशाच्या पंधानमंत्र्याच्या बरोबर प्रधानमंत्री कार्यालयाने आणि प्रधानमंत्र्यांनी स्वत: महाराष्ट्रासाठी पाठपुरावा केला. आणि बारा गडकिल्ले त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात झाले. मी माननिय पंतप्रधानाचे, केंद्रीय मंत्री मंडळाचे, सगळ्यांचे राज्य सरकारच्यावतीने आभार मानतो.
या बारा गडकिल्यांचे संवर्धन करणे, इतिहासकाळात गडकिल्ले जसे होते तसे पूर्नस्थापित करणे, ते काम सांस्कृतिक कार्य विभाग आणि पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तिन्ही विभागाच्यावतने एकत्र आराखडा तयार करण्यात येईल. प्रतापगडाच्या संवर्धनाचे काम पहिल्या टप्यात सुरु केलेले आहे.
दुसऱ्या टप्यातले काम आम्ही सगळे जण बसून लवकरच निर्णय घेवू, या सगळयांमुळे महाराष्ट्रातल्या छ. शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या गडकिल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठ महत्व या निमित्ताने आता प्राप्त झालेले आहे. ते जतन करणे आणि या गडकिल्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती सर्वाना प्राप्त करुन देणे हे राज्य सरकारचे आद्य कर्तव्य आहे.
आमची जबाबदारी आहे. आम्ही सगळेजण प्रयत्न करु. पर्यटन विभागाकडून फोर्ट टुरिझम तथा गडकिल्यांचे पर्यटन याचा पहिल्या टप्याचा आराखडा मी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तयार करायला घेतला होता. हा पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वाकडे येतो आहे.
त्याच्यामध्ये शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगड, अजिंक्यतारा आणि पन्हाळा या सगळ्यांचा पहिल्या टप्यात समावेश केलेला आहे. या गडकिल्यांचे एकत्र सर्कीट तयार करण्यात येणार आहे. एक किल्ला बघायला पर्यटक गेल्यानंतर त्यांना सहाही किल्ले बघावे असे वाटणार आहे. तो पर्यटक ते किल्ले पाहू शकतो. असे आमच्या विभागाकडून नियोजन केलेले आहे.
अनेक चागल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पन्हाळा गडाचे म्हणाल तर पन्हाळयावर स्वत: आमचे, एमटीडीसीचे रिसार्ट डेव्हलप करायचे काम सुरु आहे. त्यास ऐतिहासिक लुक देवून तयार करण्यात येत आहे. लवकरच त्याचे उद्घाटन मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सातारा जिल्हाला अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रतापगडाचा समावेश पहिल्या यादीत झालेला आहे. आम्ही त्याबद्दल आनंद व्यक्त करतो, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे गटास आम्ही पुरुन उरलो
राजकीय प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटास आम्ही पुरुन उरलो आहे. मग ते अनिल परब असतील, किंवा अंबादास दानवे असतील त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तरे तेथेच दिलेली आहेत. तसेच संजय शिरसाठ यांच्या व्हिडीओबाबत छेडल्यावरही त्यांनी शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.
त्यांची ती कपड्याची बॅग असल्याचे सांगितले असून तो व्हिडीओच एआयद्वारे मार्फिंग केलेला आहे, असा दावा केला. दरम्यान, सभागृहात गोगावले यांनी काहीतरी खाल्याचे दाखवल्यात आले असल्याबाबत छेडले असता त्यांनीच इलायचीची पुडी काढून देत इलायची खाल्ली होती असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालिकेत घेतला आढावा
सातारा नगरपालिकेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट देवून त्यांनी सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह खाते प्रमुख उपस्थित होते.