For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शमाची रणजीत चमक, पण आंतराष्ट्रीय स्पर्धातून बाहेर

06:40 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
शमाची रणजीत चमक  पण आंतराष्ट्रीय स्पर्धातून बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकत्ता

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रणजी ट्रॉफीमध्ये अपवादात्मक कामगिरी करत आहे. त्याने 28 षटकांत 8 बळी घेतले. गेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात त्याने उत्तराखंडविरुद्ध 7 बळी घेतले. शमी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी सातत्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. या दमदार कामगिरीसह, शमी भारतीय निवडकर्त्यांना हे सांगू इच्छितो की तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि भारतीय संघात परतण्यास तयार आहे.

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. तथापि, शमी या संघाचा भाग नाही. मोहम्मद शमीची दमदार गोलंदाजी बंगाल आणि गुजरात यांच्यातील सुरू असलेल्या ग्रुप स्टेज सामन्यात मोहम्मद शमीने 8 बळी घेतले. गुजरातच्या पहिल्या डावात 18.3 षटकांत 3/44 धाव घेतले. तथापि, दुसऱ्या डावातही गुजरातचे फलंदाज शमीचा सामना करू शकले नाहीत. गुजरातच्या दुसऱ्या डावात शमीने पाच फलंदाजांना बाद केले आणि पाच बळी घेतले. शमीच्या स्फोटक गोलंदाजीमुळे बंगालला 141 धावांनी सामना जिंकता आला.

Advertisement

शमी आणि निवडकर्त्यांमध्ये सुरू असलेला तणाव भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून शमी संघाबाहेर आहे.पत्रकार परिषदेत शमीच्या दुखापतीबद्दल विचारले असता मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, कोणतीही अपडेट नाही, असे शमीने माध्यमांशी बोलताना उत्तर दिले, मी खेळण्यासाठी उपलब्ध आहे. जर मी तंदुरुस्त नसतो तर मी रणजी ट्रॉफी कशी खेळू शकेन. अजित आगरकरला शमीकडून हे उत्तर मिळाल्यावर मुख्य निवडकर्ता म्हणाले, मला वाटते शमी आणि मी याबद्दल बोलले पाहिजे.

Advertisement
Tags :

.