For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग विरोधात लढा तीव्र करणार, हलकर्णीत ठराव

04:35 PM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
shaktipeeth highway  शक्तिपीठ महामार्ग विरोधात लढा तीव्र करणार  हलकर्णीत ठराव
Advertisement

हा भाग शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे

Advertisement

चंदगड : शक्तिपीठ महामार्ग चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय सोमवारी हलकर्णी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.

माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, हा महामार्ग शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, उलट शेतजमीन आणि निसर्ग उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे या प्रश्नात राजकारण न करता सर्वांनी एकजुटीने या विरोधात लढा दिला पाहिजे. त्यांनी जनतेमध्ये प्रबोधन करून हा लढा व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई म्हणाले, राज्यातील 12 जिल्ह्यांतील शेतकरी या महामार्गाच्या विरोधात उभे आहेत. सर्वत्र जोरदार विरोध असतानाही चंदगडचे आमदार मात्र या महामार्गासाठी आग्रह धरत आहेत, हे दुर्दैवी आहे. हा भाग शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे. त्यामुळे येथे वेगळ्या विकासाची गरज नाही.

संग्रामसिंह कुपेकर म्हणाले, आम्ही राजकीय हेतूने एकत्र आलेलो नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकवटले आहोत. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे उद्ध्वस्त करणार असल्याने हा विरोध अपरिहार्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांन्नावर म्हणाले, हा महामार्ग केवळ अदानीसारख्या उद्योगपतींसाठी गोव्याकडे खनिज वाहतुकीसाठी आहे.

विकास’ हे फक्त खोटं नाव आहे. शेतकरी आणि निसर्ग वाचवण्यासाठी आम्ही लढत राहू. शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, चारही राज्यांत या महामार्गाला विरोध असताना चंदगडचे आमदार त्याची मागणी करत आहेत, हे समजण्यासारखे नाही. या प्रकल्पाला सर्वांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे.

गोपाळराव पाटील म्हणाले, यासंदर्भातील सर्व माहिती घेत गावोगावी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती केली पाहिजे. शेतकरी उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून एकत्रित लढा आवश्यक आहे. बैठकीत संतोष मळवीकर, रियाज शमनजी यांनीही भूमिका मांडली.

यावेळी विद्याधर गुरबे, अमर चव्हाण, अभय देसाई, कॉ. संजय तरडेकर, सुभाष देसाई, तात्यासाहेब देसाई, भिकाजी गावडे, तानाजी गडकरी, एम. जे. पाटील, भरमाना गावडे, जयवंतराव सरदेसाई, शेखर गावडे, संतोष मोरे, अमृत जत्ती, पांडुरंग बेनके, गोविंद पाटील, विष्णू गावडे, शरद मथकर, दिलीप वाके, मनोहर गावडे, विवेक

Advertisement
Tags :

.