For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शकीबच्या समर्थकांची ढाक्यात निदर्शने

06:30 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शकीबच्या समर्थकांची ढाक्यात निदर्शने
Advertisement

यजमान बांगलादेश आणि द. आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. बांगला माजी कर्णधार शकीब अल हसन याची ही शेवटची कसोटी मालिका असून यानंतर तो निवृत्त होणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी त्याची संघात निवड केली असताना तो काही तांत्रिक अडचणींमुळे बांगलादेशमध्ये दाखल न झाल्याने त्याच्या समर्थकांनी मिरपूर क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर निदर्शने केली.

Advertisement

शकीब अल हसनचे वास्तव्य सध्या अमेरिकेत आहे. तो या मालिकेसाठी ढाक्याकडे रवाना होत असताना काही सुरक्षेच्या समस्येवरुन शकीबचा विमान प्रवास रद्द करावा लागला. ही बातमी समजताच मिरपूर स्टेडियमच्या बाहेर शकीबच्या शेकडो शौकिनांनी जोरदार निदर्शने केली. बांगलादेश संघातून शकीबला वगळूच शकत नाही, अशी घोषणा या समर्थकांनी दिली. अलिकडेच बांगलादेश संघाने भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये कानपूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यावेळी शकीब अल हसनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीचे संकेत दिले होते. द. आफ्रिकाबरोबरची ही आगामी कसोटी मालिका त्याची शेवटची असल्याने त्याला बांगलादेश क्रिकेट मंडळातर्फे या मालिकेत शानदार निरोप देण्यात येणार होता. शकीब अल हसनने बांगलादेशच्या राजकारणामध्ये 2023 साली प्रवेश केला. तो बांगलादेशमधील अवामी लीग पक्षामध्ये दाखल झाला आणि 2024 च्या बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याने या पक्षाकडून तिकीट घेऊन विजय मिळविला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.