For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय हॉकी संघाचा ब्रिटनवर विजय

06:51 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय हॉकी संघाचा ब्रिटनवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था/ जोहोर बेहरु (मलेशिया)

Advertisement

येथे सुरु असलेल्या सुल्तान ऑफ जोहोर चषक कनिष्ठ पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने ब्रिटनचा 6-4 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत भारताने शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात जपानला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती.

रविवारच्या सामन्यात भारतातर्फे दिलराज सिंग आणि शारदानंद तिवारी यांनी प्रत्येकी 2 गोल नेंदविले. सामना सुरु झाल्यानंतर सातव्याच मिनिटाला भारताचे खाते मोहम्मद कोनेन दाडने उघडले. दिलराज सिंगने 17 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. शारदानंद तिवारीने 20 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल नोंदविला. मनमीत सिंगने 26 व्या मिनिटाला शानदार गोल केला. मध्यंतरापर्यंत भारतातर्फे 4 गोल नोंदविले गेले. दिलराज सिंगने 50 व्या मिनिटाला भारताचा पाचवा तर शारदानंद तिवारीने 51 व्या मिनिटाला भारताचा सहावा गोल नोंदविला. ब्रिटनतर्फे रोरी पेनरोजने दुसऱ्या आणि 15 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर मिचेल रॉयडेनने 46 व्या आणि 59 व्या मिनिटाला दोन गोल केले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारताने ब्रिटनवर 4-2 अशी आघाडी घेतली होती. या स्पर्धेत भारताने 3 गुण मिळाले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.