शकीब अल हसनचा निवृत्तीचा निर्णय मागे
वृत्तसंस्था / लंडन
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शकीब अल हसनने यापूर्वी घोषित केलेला आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. शकीब अल हसनने यापूर्वी कसोटी आणि टी-20 या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. पण आता क्रिकेटच्या सर्व तीन प्रकारात पुन्हा बांगलादेशचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
शकीब अल हसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीचा निर्णय एक वर्षांपूर्वी जाहीर केला होता. त्याने कसोटी आणि टी-20 प्रकारातून हा निर्णय घेतला होता. दरम्यान आपण क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अद्याप निवृत्तीचा निर्णय अधिकृतपणे घेतला नसल्याचे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. बांगलादेशमध्ये आपण पूर्ण मालिका (वनडे, कसोटी, टी-20) खेळल्यानंतर मी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले. 2024 च्या मे पासून शकीब अल हसनचा बांगलादेश संघात समावेश नव्हता. अलिकडच्या कालावधीत शकीब अल हसनने पाक आणि भारतामध्ये कसोटी सामने खेळला आहे. कानपूर येथे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत तो खेळला होता. मायदेशांत पूर्ण मोठी मालिका खेळण्याची आपली इच्छा त्याने व्यक्त केली आहे.