For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटरसायकल चोरीसह मेडिकल दुकान फोडणारा चोरटा शाहूवाडी पोलीसांकडून जेरबंद

05:22 PM Sep 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
मोटरसायकल चोरीसह मेडिकल दुकान फोडणारा चोरटा शाहूवाडी पोलीसांकडून जेरबंद
Shahuwadi Police
Advertisement

मुद्दे मालासह चोरटा अटक

शाहूवाडी प्रतिनिधी

शाहुवाडी पोलीस ठाणे हद्दीतील त्याचबरोबर अन्य ठिकाणी मेडिकल दुकान व मोटरसायकलची चोरी करणाऱ्या विशाल संभाजी पवार रा. उमराणी ता. जत या अट्टल चोरट्यास शाहूवाडी पोलिसांनी बांबवडे येथे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून मुद्देमालासह 60 हजार रुपयेंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीनुसार बांबवडे येथे टु- व्हिलर चोरणारा चोरटा येणार असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपास करता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी त्याला विश्वासात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली. असता. त्याने शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मेडिकल दुकान त्याचबरोबर मोटरसायकल चोरी केली असल्याचे कबूल केले.

सदर आरोपी हा सराईत अट्टल चोरटा असून त्याच्याकडून एक स्प्लेंडर मोटरसायकल, पाना, हातमोजे असा 60 हजार  रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने शाहूवाडी, भुदरगड, शाहूपुरी, श्रीगोंदा आधी ठिकाणी मेडिकल दुकान फोडली असल्याचे कबूल केले. त्याच्या विरोधात कवठेमंकाळ, सांगोला, निफाड, लासलगाव, पिंपळगाव, कळंब, करवीर, कराड शहर, कराड तालुका, मुरगुड, हातकणंगले आदी ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. या तपास मोहिमेत पोलिस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस सब- इन्स्पेक्टर सायबर ठाणे अविनाश मेहत्रे, पोलीस कॉन्स्टेबल भाट, राज सनदी, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, पाटील, यशदे, पाटील आदींनी सहभाग नोंदवला.

Advertisement

Advertisement
Tags :

.