Kolhapur Crime : सोशल मीडियावर दादागिरी दाखवणाऱ्या तरुणांचा शाहूपुरी पोलिसांनी उतरला रुबाब !
आक्षेपार्ह स्टेटसवरून शाहूपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : 'आम्हीच कोल्हापूरचे बाप' असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा तरुणांवर शाहूपुरी पोलिसांनी धडक कारवाई केली. नागाळा पार्क परिसरात रोज रुबाबात फिरणाऱ्या या टोळक्याला काल सोमबारी दि. ३ रोजी दुपारी पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याकडून लोकांसमोर उठा-बशा काढायला लाऊन त्यांच्या रुबाबाची हवा काढली. ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या प्रकरणी विशाल उर्फ सर्किट अनिल साळुंखे (३३, महाराणा प्रताप चौक), ओमकार दादा साबळे (२३, भाजी मंडई, कसबा बावडा), रुपेश सुनील काशिद (२६, कृष्णानंद कॉ लनी), भार्गव राहुल भोसले (२२, रंकाळा टॉवर), वैभव विष्णू सूर्यवंशी (२९, शाहू मिल चौक) आणि आर्यन दीपक मोरे (१९, संकपाळ नगर). यांच्यावर कारवाई करण्यात आली. हे सर्वजण कोणताही संबंध नसतानाही रोज कॉलेज परिसरात जमून स्वतःला टोळधाडीप्रमाणे दाखवत होते. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर 'मर्डर फिक्स २०२५' नावाचे रिल्स पोस्ट करून हे तरुण प्रसिद्धी मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
मात्र, या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष गेले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सर्व तरुणांना नागाळा पार्कमधून ज्या रस्त्यांबर ते रोज मिरवत होते त्याच ठिकाणी उठाबशा काढायला लावून त्यांचा रुबाब उत्तरवला. या कारवाईनंतर सर्वांनी कबुली देत भविष्यात अशा प्रकारचे आक्षेपार्ह रिल्स किंवा स्टेटस ठेवणार नाही अशी कबुली दिली. शहर पोलिसांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार अशाप्रकारे सोशल मीडियावर गुंतागुंतीचा किंवा धमकीवजा मजकूर टाकणाऱ्यांबर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.