For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहू निळकंठाचे सलग तिसऱ्यांदा अजिंक्य

10:44 AM Sep 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
शाहू निळकंठाचे सलग तिसऱ्यांदा अजिंक्य
Advertisement

बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स क्लब आयोजित एस पी ऑटो अॅक्सेसरीज पुरस्कृत 47 वी श्री गणेश चषक चषक सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शाहू निळकंठाचेने संतोष सुळगे- पाटीलचा एक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळून सलग तिसऱ्यांदा श्री गणेश चषक पटकाविला. सरदारर्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना शाहू निळकंठाचे व संतोष शेळके पाटील यांच्यात झाला. संतोष  सुळगे-पाटीलने प्रथम फलंदाजी करताना एक षटकात 2 चौकारासह 12 धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल खेळताना शाहू नीलकंठाचेने पहिले दोन चेंडू निर्धाव गेले तिसरा चेंडूवरती एक धाव घेतली त्यानंतर सलग दोन चेंडूवर दोन उत्तुंग षटकार खेचून शाहू निळकंठाच्याने एक चेंडू बाकी ठेवत विजेतेपद पटकाविले.

Advertisement

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कृत शरद पाटील, सुहास पाटील, पंच बाबुराव कुटे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रतीक पाटील, बाबू इंगोले, मनोज निर्मळकर, मंगेशकर, दिपक पवार, आदित्य पाटील, गंगाधर पाटील, राहुल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शाहू निळकंठाचेला आकर्षक चषक, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या संतोष सुळगे-पाटीलला चषक, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.  वैयक्तिक बक्षीस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - रोहित मुरकुटे, उत्कृष्ट यष्टीरक्षक-निखिल चंदग, उत्कृष्ट šाsल- ईश्वर आनंदपुर, उत्कृष्ट फलंदाज-सुनील पाटील, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू- राहुल पाटील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पवन बडवाण्णाचे यांना चषक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सुनील पाटील, नामदेव, यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंकज पाटील, अनिल पाटील, सुशांत शिंदे यांनी विशेष परिश्र्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.