शाहरुख अन् विक्रांत सर्वोत्कृष्ट अभिनेता
‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : केंद्र सरकारकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली. राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्यूरीने माहिती-प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री एल. मुरुगन यांना याच्याशी संबंधित अहवाल सादर केला होता. यानंतर ज्युरींनी पत्रकार परिषदेत पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित केली आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जीला मिळाला तर शाहरुख खान आणि विक्रांत मैसी हे सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरले आहेत. याचबरोबर 2023 Aमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्यामची आई’ हा चित्रपट मराठीत सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. शाहरुख, राणी मुखर्जी आणि विक्रांत मैसी यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर अभिनेत्री सान्या मल्होत्राचा चित्रपट ‘कटहल’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘अॅनिमल’ने साउंड डिझाइन आणि बॅकग्राउंड स्कोरच्या श्रेणीत पुरस्कार पटकाविले आहेत. तर अदा शर्माची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘द केरळ स्टोरी’साठी दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विक्की कौशलच्या ‘सॅम बहादूर’ला सर्वोत्कृष्ट मेकअप आणि कॉस्ट्यूमचा पुरस्कार मिळणार आहे.
पुरस्काराच्या श्रेणी मानकरी
सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट पाई तांग
सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट भगवंत केसरी
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट पार्किंग
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट श्यामची आई
सर्वोत्कृष्ट मल्याळी चित्रपट उल्लोओझुक्कू
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट कंदीलु-द रे ऑफ होप
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कटहल : अ जॅकफ्रूट मिस्ट्री
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट वश
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट डीप फ्रिज
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट रोंगातपु 1982
सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान, विक्रांत मैसी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदिप्तो सेन
स्टंट कोरियोग्राफी हनुमान (तेलगू)
सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी वैभवी मर्चंट (ढिंढोरा बाजे रे गीत)
सर्वोत्कृष्ट गीत बालगाम (तेलगू)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन वाथी (तमिळ)
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोर हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)
सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम सचिन लोवालेकर, दिव्या अन् निधी गंभीर
सर्वोत्कृष्ट मेकअप श्रीकांत देसाई (सॅम बहादुर)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन 2018 एवेरीवन इज अ हीरो
सर्वोत्कृष्ट एडिटिंग पुकल्लम (मल्याळी)
बेस्ट साउंड डिझाइन अॅनिमल
सर्वोत्कृष्ट पटकथा बेबी (तेलगू) अन् पार्किंग (तमिळ)
सर्वोत्कृष्ट पटकथालेखक दीपक किंगरानी (सिर्फ एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी द केरळ स्टोरी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका शिल्पा राव (चलिया)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पीवीएन एस. रोहित (बेबी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार सुकृति वेणु बंदरेद्दी, कबीर खंदारे, तृषा थोसार, श्रीवानस, भार्गव
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री जानकी बोदीवाला, उर्वशी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय राघवन