'शाहीद कपूर'चा 'देवा' आज प्रदर्शित
बॉक्स ऑफीसवर देवा सिनेमाची जादू पडली कमी
मुंबई
दाक्षिणात्य सिनेमातील दिग्दर्शक रोशन अॅण्ड्र्यु हे देवा सिनेमातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहेत. देवा सिनेमा आज (३१ रोजी) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीद कपूर आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या सिनेमात शाहीद कपूर देव आम्ब्रे या पोलिस ऑफीसरची भूमिका साकारत आहे. या सिनेमातील देव आम्ब्रे हे पात्र खूप अॅग्रेसिव्ह आहे. त्यामुळे शाहीदच्या देव आणि कबीर सिंग या दोन्ही पात्रांमध्ये चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात तुलना होत आहे. त्यामुळे शाहीद कपूरच्या या देवा सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अजून आपली जादू दाखविली नाही आहे.
देवा सिनेमाचे बॉक्स ऑफीसवरचे ओपनिंग हे स्लो होईल. साधारण ५ ते१० करोडच्या आसपास होईल असे, पूर्वीच अंदाज केला होता. पण अंदाजापेक्षा कमी म्हणजे १. ७ कोटी इतकेच ओपनिंग या सिनेमाला मिळाले आहे. साधरण या सिनेमाचे ३.५ कोटीमध्ये पहिल्या आठवड्याचा बिझनेस जाईल असा अंदाज आहे.
यावर एका पत्रकार परिषदेत शाहीद कपूर ने देव हे पात्र पूर्णतः वेगळे आहे. या पात्रात कबीर सिंग या भूमिकेची झलक ही नाही आहे.
कधी आपण एखाद्या दिग्दर्शिकासोबत काम करायचं म्हणून चित्रपट स्विकरतो, तर कधी एखाद्या पात्राच्या प्रेमात आपण ते साकारतो. त्याचप्रमाणे मी या खूप खूश आहे. या सिनेमातील माझी भूमिका खूप खास आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री पूजा हेगडे हिने दिली.
हा सिनेमा ११ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता. पण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रिलीड करण्यासाठी पुढे ढकलला. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी ३१ जानेवारीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.