पाक संघात शाहीन आफ्रिदीचे पुनरागमन
वृत्तसंस्था / लाहोर
पाकचा क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून उभय संघामध्ये वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार आहेत. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या पाकच्या टी-20 संघात पाकच्या निवड समितीने वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला संधी दिली आहे. पाकच्या वनडे संघाचे नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान पाक टी-20 संघाचे नेतृत्व सलमान अली आगा करणार आहे.
हसन अली आणि हॅरिस रौफ यांनाही संघात स्थान देण्याचा निर्णय पाक निवड समितीने घेतला आहे. अलिकडेच झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेमध्ये हसनअली आणि रौफ सहभागी झाले नव्हते. बाबर आझमचा पाकच्या वनडे संघात समावेश राहील. उभय संघातील टी-20 मालिकेतील तीन सामने, 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान फ्लोरीडा येथे खेळविले जातील. त्यानंतर उभय संघातील वनडे मालिका त्रिनीदादमध्ये आयोजित केली आहे. विंडीज दौऱ्यासाठी अब्बास आफ्रिदी, अहमद दानियाल व सलमान मिर्झा यांना मात्र वगळले आहे.
पाक टी-20 संघ: सलमान अली आगा (कर्णधार), अब्रार अहमद, फईम अश्रफ, फक्र झमान, हॅरीस रौफ, हसनअली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शहा, मोहम्मद हॅरीस, मोहम्मद नवाज, एस. फरहान, सईम आयुब, शाहीन आफ्रिदी व सुफीयान मुक्कीम.
पाक वनडे संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, अब्दुला शफीक, अब्रार अहमद, फईम अश्रफ, फक्र झमान, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, मोहम्मद हॅरीस, नशीम शहा, मोहम्मद नवाज, सईम आयुब, शाहीन आफ्रिदी व सुफीयान मुक्कीम.