For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहापूर विभागीय बुद्धिबळ-योगा स्पर्धा उत्साहात

10:08 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहापूर विभागीय बुद्धिबळ योगा स्पर्धा उत्साहात
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व ज्ञान मंदिर आयोजित शहापूर विभागीय माध्यमिक बुद्धिबळ व योगा स्पर्धा मोठ्या उत्साहात झाल्या. ज्ञान मंदिराच्या सभागृहात बुद्धिबळ व योगा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. व्ही. मठपती, मुख्याध्यापिका अलका जाधव, क्रीडा शिक्षक बापु देसाई, मॅथ्यु लोबो, मधुश्री, मगदूम व नरसन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सोंगड्याला चाल देवून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.

Advertisement

निकाल पुढील प्रमाणे...

योगा- मुलांच्या गटात : यश ढवळी, राहुल पाटील, सर्वेश बंडीवड्डर, दर्शन पाटील, आकाश गुंडप्पण्णावर, तर मुलींच्या गटात: लक्ष्मी पाटील, चेतना ऐय्यर, श्रवणी अरुंदेकर, विजयाश्री तिगडी, तन्वी गोंदकर यांनी विजेतेपद पटकाविले. बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या गटात : नागराज मास्तीहोळी, चंदन विरापूरकर, लिखित शहापूर, विठ्ठल कुरडेकर, श्रेयश मुन्नवळी तर मुलींच्या गटात : अनुष्का एकबोटे, चंदना कामकर, पौर्णिमा कोटबागी, दिव्या सातेरी, ऐश्वर्या खांदापुरे यांनी विजेतेपद पटकाविले. 14 वर्षांखालील गटात मुलांमध्ये साईश रायकर व रोहन पाटील, गंगोत्री सुणगार यांनी विजेतेपद पटकाविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.