For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहाबुद्दीनचा पुत्र ओसामाची तीन महिन्यांनी सुटका

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहाबुद्दीनचा पुत्र ओसामाची तीन महिन्यांनी सुटका
Advertisement

सिवान : बिहारमधील दिवंगत बाहुबली नेता शहाबुद्दीनचा पुत्र ओसामाची तुरुंगातून गुरुवारी सुटका झाली आहे. शहाबुद्दीनचा पुत्र हा दोन गुन्ह्यांप्रकरणी तुरुंगात कैद होता. मोतिहारी येथील जमीन वादावरून हल्ला केल्याचा तसेच छतिया येथे जमीन बळकाविल्याचा आरोप त्याच्यावर होता. दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी ओसामा हा तुरुंगात कैद होता. ओसामाला पाटणा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. यानंतर ओसामा हा गुरुवारी सिवानच्या तुरुंगातून बाहेर पडला आहे. तुरुंगाबाहेर शेकडो समर्थकांनी ओसामाचे जोरदार स्वागत केले आहे. ओसामाच्या मुक्ततेप्रकरणी शहाबुद्दीनची पत्नी हीना शहाबने न्यायालयावर पूर्ण विश्वास होता असे म्हटले आहे. शहाबुद्दीनचे निधन झाल्यावर त्याचे कुटुंबीय आणि राजद नेतृत्व यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे मानले जात आहे. शहाबुद्दीनचे कुटुंबीय आता राजद वगळून अन्य राजकीय पर्यायांचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.