शेफाली टी-20 क्रमवारीत पुन्हा टॉप-10 मध्ये
वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्मा पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये पोहोचली आहे. इंग्लंडविऊद्ध नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत 158.56 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा काढणारी शेफाली 655 गुणांसह चार स्थानांनी झेप घेऊन नवव्या स्थानावर पोहोचली आहे.
उपकर्णधार स्मृती मानधना तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघात अव्वल स्थानावर आहे. तर मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज दोन स्थानांनी घसरून 14 व्या स्थानावर पोहोचली आहे. भारताच्या 3-2 अशा ऐतिहासिक मालिका विजयात आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावणारी अऊंधती रे•ाr चार स्थानांनी झेप घेऊन गोलंदाजी क्रमवारीत 39 व्या स्थानावर आणि अष्टपैलू खेळाडूंमध्ये 26 स्थानांनी प्रगती करत 80 व्या स्थानावर पोहोचली आहे. अनुभवी ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर आली आहे तर डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव गोलंदाजी क्रमवारीत तीन स्थानांनी पुढे जाऊन 15 व्या स्थानावर पोहोचली आहे.
इंग्लंडच्या अनेक स्टार खेळाडूंनीही सकारात्मक प्रगती केली. मालिकेतील शेवटच्या सामन्यात सामनावीराच्या कामगिरीनंतर फिरकी गोलंदाज चार्ली डीनने टॉप-10 गोलंदाजांच्या क्रमवारीत स्थान मिळवले. आठ स्थानांनी झेप घेत नशरा संधू आणि जॉर्जिया वेअरहॅमसह सहाव्या स्थानावर पोहोचली.
लिन्सी स्मिथनेही नऊ स्थानांनी झेप घेत 38 व्या स्थानावर पोहोचली आहे, तर वेगवान गोलंदाज इस्सी वोंगने सात स्थानांनी झेप घेऊन 50 व्या स्थानावर पोहोचली आहे. एमिली अर्लोट्ट 15 स्थानांनी सुधारणा करून 67 व्या स्थानावर झेप घेतली आहे.