कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विश्व भारती विद्यापीठ प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप

06:29 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलकाता :

Advertisement

कोलकात्याच्या विश्व भारती विद्यापीठातील तीन विद्यार्थिनींनी एका अतिथी प्राध्यापकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सेमिस्टर परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात प्राध्यापकाने शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. अब्दुल्ला मोल्ला असे संबंधित प्राध्यापकाचे नाव आहे. मोल्लांविरोधात दिलेल्या तक्रारीत तीन विभागातील विद्यार्थिनींनी आरोप केले आहेत. हे विद्यार्थी पार्शियन, उर्दू आणि इस्लामिक स्टडीज विभागातील आहेत. सदर अतिथी शिक्षकाने वैयक्तिकरित्या आपल्याला अश्लील संदेश पाठवण्याबरोबरच अनेक वेळा अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी 28 मार्च रोजी शांतीनिकेतन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपण नापास होऊ, अशी भीती दाखवून आपला छळ करण्यात आल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. प्राध्यापकाच्या कारवाया वाढत गेल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांच्याविऊद्धचे सर्व पुरावे घेऊन पोलीस ठाणे गाठले. त्यांनी प्राध्यापकांनी पाठवलेले मेसेज दाखवले. या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article