महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ऐन सणासुदीतच वडगावात गटारीचे काम

11:27 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्यावसायिकांना मोठा फटका : तीव्र संताप

Advertisement

बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील नाझर कॅम्प, कारभार गल्ली, आनंदनगर परिसरातील गटारींची पुन्हा नव्याने बांधणी करण्यासाठी व स्वच्छतेसाठी खोदाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळातच ही खोदाई करण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही वर्षापूर्वी या गटारींची बांधणी करण्यात आली होती. मात्र पुन्हा नव्याने गटारी बांधण्यासाठी खोदाई केली आहे. याचबरोबर गटारी स्वच्छही केल्या जात आहेत. मात्र ऐन सणातच खोदाई केल्यामुळे दुकानदारांना मोठा फटका बसला आहे.

Advertisement

अनेकांना व्यवसायच बंद करावा लागला आहे.गणेशोत्सवाच्या अगोदरच ही खोदाई करण्यात आली. मात्र त्याचे काम गणेशोत्सव संपलातरी पूर्ण झाले नाही. गणेशोत्सव काळात अधिक व्यापार झाला असता. त्याचबरोबर आता दसराही तोंडावरच आहे. त्यामुळे त्या सणाचाही व्यवसाय बुडाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गटारी स्वच्छ करायच्या असतील तर दिवाळीनंतर केल्या असत्या तरी त्रास झाला नसता. मात्र सणातच गटारी खोदाईमुळे फटका बसला आहे. अनेकांनी दुकानासमोर तसेच घरासमोर काँक्रीट व फरशी बसविली होती. ती काढण्यात आल्यामुळे नव्याने पुन्हा काँक्रीट व फरशी बसवावी लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article