महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोरजी पंचायत क्षेत्रात ओहोळ नाल्यामध्ये सांडपाणी

11:48 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सोडण्याचा प्रकार, सरपंच म्हणतात आपण  प्रदूषण मंडळा कडे तक्रार देणार

Advertisement

मोरजी : सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली असून मोरजी पंचायत क्षेत्रातील ओहोळ नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडून परिसरात दुर्गंधी पसरवली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंगू मलेरिया अशा रोगराईला आमंत्रण मिळणार आहे. आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी मोरजी सरपंच मुकेश गडेकर हे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आरोग्य खात्याला व प्रदूषण महामंडळाला निवेदन सादर करणार आहे. मधला वाडा मोरजी येथील पोय तथा ओहोळ मध्ये एका हॉटेल व्यवसायिकाने थेट सांडपाणी या ओहळात नाल्यात सोडून दुर्गंधीमय परिसर केलेला आहे. या परिसरातून जाताना नाक तोंड दाबून जावे लागत आहे. याकडे आज पर्यंत आरोग्य खाते, प्रदूषण महामंडळाने दुर्लक्ष केल्याने अशा व्यावसायिकांचे आयतेच फावत आहे. आपल्या व्यवसायातील सांडपाण्याची स्वत: विल्हेवाट लावण्याऐवजी ते थेट गटार ओहोळ नाले पोईमध्ये सोडून परिसर दुर्गंधी मय करत आहे.

Advertisement

दरम्यान काल सोमवारी स्थानिक सरपंच मुकेश गडेकर यांनी घटनास्थळी येऊन या पोयची पाहणी केली. सदर सांडपाणी सोडणाऱ्याने याचा बंदोबस्त करावा, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी दिला. नागरिकांनी, हॉटेल व्यवसायिकांनी आपापल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न कराव. सार्वजनिक ठिकाणी पाणी सोडून दुर्गंधीमय परिसर करू नये. आपण 26 रोजी आरोग्य खात्याकडे याविषयी तक्रार करणार असल्याचे सरपंच मुकेश गडेकर यांनी सांगितले. स्थानिक श्री दाभोलकर यांनी प्रतिक्रिया देताना या पाण्याविषयी अनेक वेळा आम्ही तोंडी तक्रारी केल्या आहेत. कुणीच दखल घेत नाही. जर यापुढे दखल घेतली नाही तर नागरिकांच्या सह्या घेऊन सरकारला निवेदन सादर करणार आहोत. यापूर्वी पंचायतीला कळवले होते परंतु कोणीच दखल घेतली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदार संघासाठी खास सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा केलेली आहे. जागा उपलब्ध लवकर झाली, तर सहा महिन्याच्या आत हा प्रकल्प उभारू अशी आमदार जीत आरोलकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे बोलताना माहिती दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article