महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर भारतात कडाक्याची थंडी, दाट धुके! रेल्वे-विमान वाहतुकीवर परिणाम

06:12 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

: पंजाब, हरियाणा, दिल्लीसह उत्तर प्रदेशात दैनंदिन जीवनमानात बदल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्मयाची थंडी कायम आहे. रविवारी सकाळीही या संपूर्ण परिसरात दाट धुके होते. या काळात काही भागा शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. बऱ्याच भागात पहाटेच्यावेळी पडत असलेल्या दाट धुक्मयामुळे लोकांच्या प्रवासावर परिणाम होत आहे. धुक्मयामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 22 रेल्वेगाड्या रविवारी उशिराने धावत होत्या. तसेच पहाटे 4.30 ते 7 या वेळेत 7 विमाने जयपूर आणि एक विमान मुंबईकडे वळवण्यात आले. तसेच चेन्नईत तीन आंतरराष्ट्रीय उ•ाणेही वळवण्यात आली.

उत्तर भारतातील अनेक भागात शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. येथील सरासरी किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये रविवारी दाट धुक्मयाची चादर पसरली होती. पुढील 5 ते 6 दिवस हीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

या हंगामात पहिल्यांदाच दिल्लीतील पालम, सफदरजंग, राजस्थानमधील श्रीगंगानगर, पंजाबमधील पटियाला, हरियाणातील अंबाला, चंदिगड, उत्तर प्रदेशातील बरेली, लखनौ, बहराइच, वाराणसी, प्रयागराज आणि आसाममधील तेजपूर येथे शून्य दृश्यमानता नोंद झाली. अनेक राज्यांमध्ये सूर्यप्रकाशही येत असला तरी थंड वाऱ्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत नाही.

थंडीच्या लाटेमुळे पुढील 3 दिवस उत्तर प्रदेशात कडाक्मयाची थंडी राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील 19 जिल्ह्यांमध्ये कडाक्मयाच्या थंडीचा इशारा, 54 जिल्ह्यांमध्ये दाट धुके आणि 33 जिल्ह्यांमध्ये हिमवादळ आणि दव पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बिहार, नोएडात शाळांना सुटी

बिहारमधील थंडी लक्षात घेता पाटण्यात आठवीपर्यंतच्या सर्व शाळा 16 जानेवारीपर्यंत बंद घोषित करण्यात आल्या आहेत. थंडी आणि धुक्मयाच्या पार्श्वभूमीवर नोएडातील सर्व शाळांमध्ये 16 जानेवारीपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. वाढत्या थंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची नोटीस शिक्षणाधिकारी कार्यालयाने जारी केली आहे.

दिल्लीत शाळांच्या वेळेत बदल

दिल्लीत सर्व शाळा सोमवारपासून म्हणजेच आजपासून सुरू होतील. मात्र त्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, दिल्लीतील सर्व वर्ग फिजिकल मोडमध्ये चालतील, परंतु थंडीमुळे शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सकाळी 9.00 वाजण्यापूर्वी किंवा  सायंकाळी 5 वाजल्यानंतर कोणतेही वर्ग आयोजित करू नयेत, असे आदेश काढण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article