कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माणगंगा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली

03:39 PM May 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

म्हसवड :

Advertisement

गेल्या सहा दिवसांपासून आभाळ फाटल्याप्रमाणे वरुणराजा एकसारखा दुष्काळी भागात फटकेबाजी करत असल्याने नदी, ओढे, नाले भरभरून बाहत आहेत. या मोसमीपूर्व अवकाळी पावसामुळे फळबागांसह भाजीपाला, आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

आठ दिवसांपूर्वी कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना अवकाळीने रेकार्ड ब्रेक जोरदार में टींग करत ऐन उन्हाळ्यात चोहीकडे पाणीच पाणी केले आहे. सलग सहा दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे दुष्काळी माण तालुक्यातील जनजीवन तीन दिवसांपासून विस्कळीत होऊन काही ठिकाणी जनजीवन ठप्प झाले आहे. शुक्रवारपासून पडत असलेल्या पावसामुळे माण तालुक्यातील एकमेव माणगंगा नदी पूर्ण क्षमतेने वाहत आहे, तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरीकडे आंधळी धरणात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी सोडल्याने घरांची पडझड सुरू आहे. घरणात आधीच पाणीसाठा आहे. त्यात सध्या पडत असलेल्या पावसामुळे आंधळी धरण उन्हाळ्यात ओव्हरफूल होऊन बाहू लागले आहे. मलवडी-कुळकजाई रस्त्यावरील पुलावरून दोन दिवसांपासून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाला आहे. पळशी गावातून वाहत असलेल्या माणगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. दहिवडी, फलटणकडे जाताना बिजवडीनजीक असलेल्या ओक्याच्या पुलावरून पाणी बाहत असल्याने बाहतूक बंद झाली होती, तर पुढेही फलटण तालुक्यातील दुधेबाबी ओक्याला पाणी आल्यामुळे दहिवडा-फलटण रस्ता कालपासून बंद आहे. म्हसवड-शिंगणापूर फलटण याही रस्त्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरून पाणी बाहत आहे. याही बाजूने फलटणकडे जाणारी बाहतूक बंद झाली आहे. माण तालुक्यातील अनेक छोटे-मोठे पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. अवकाळी पावसामुळे प्रथमच ऐन कडक उन्हाळ्यात पूरस्थिती होऊन अनेक गावांचे वळणवळण ठप्प झाले आहे. फलटणला जाणारे दहिवडी-फलटण व म्हसवड-फलटण रस्ते बंद झाले आहेत.

उन्हाळी पिके असलेली भाजीपाला, कांदा, लसूण, भुईमूग, मकवान, सोयाबीन, मूग यासह हाताशी आलेल्या आंबा, द्राक्ष, संत्री, विक्कू फळबागांची नासाडी उघडता डोळ्यांनी पहाण्याची दुर्देवी वेळ बळीराजावर आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे माळबादी घरे गळू लागली असून अनेक घराच्या भिंती पडू लागल्या आहेत. घरांनाही या पावसाचा मोठा फटका बसत आहे. माणगंगा नदीवरील माने वस्तीवरील शेवटचा बंधारा गेल्या अनेक वर्षांतून वाहू लागला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article