For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime News: डंपर अंगावरून गेल्याने ७ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू

04:10 PM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
sangli crime news  डंपर अंगावरून गेल्याने ७ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू
Advertisement
पहिलीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू
भिलवडी: भिलवडी येथे अपघातामध्ये पहिलीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर चालक फरार आहे.
भिलवडी येथे शाळेतून घरी परत येत असलेल्या सात वर्षीय चिमुकल्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार १९ जुलै रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान सरकी पुलाजवळ घडली. राज वैभव पवार असे मृत बालकाचे नाव आहे. तो भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेतील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता.
शाळा सुटल्यानंतर तो आई, इतर मित्र व त्यांची आई यांच्यासोबत घरी परतत असताना माळवाडीहून भिलवडीकडे येणाऱ्या डंपर (क्र. MH 10 AW ९७२९) वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर सरळी पुलाजवळ थेट राजच्या अंगावरून गेला. अपघातात त्याचाजागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक फरार होता. तो भिलवडी पोलीसात हजर झाला. दशरथ शंकर महानोर घटनेनंतर इनामुल सुतार गंभीर अवस्थेतील राहणार ढवळी तालुका तासगाव असे डंपर चालकाचे नाव आहे.
आ. विश्वजीत कदम यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांची बैठक घेऊन माळवाडी ते औदुंबर फाटा दरम्यान स्पीडबेकर दिशादर्शक फलक' झेब्रा क्रॉसिंग, यापुढे असा अपघात घडू नये यासाठी अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या जातील.
Advertisement
Advertisement
Tags :

.