For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूर- होसपेठ सह सात रेल्वे गाड्या रद्द

07:52 PM Dec 18, 2023 IST | Kalyani Amanagi
सोलापूर  होसपेठ सह सात रेल्वे गाड्या रद्द
Advertisement

हुबळी विभागात गुलेगुड्डा - बागलकोट सेक्शन दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक

Advertisement

सोलापूर प्रतिनिधी

दक्षिण पश्चिम रेल्वेतील हुबळी विभागात गुलेगुड्डा - बागलकोट सेक्शन दरम्यान एनआय आणि ट्रॅफिक ब्लॉकच्या काम करिता गाड्या रद्द, मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत. (दुहेरी मार्ग सुरूकरण्या संबंधी एनआय काम हाती घेण्यासाठी ट्राफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक 26 ते 28 डिसेंबर रोजी गुलेगुड्डा - बागलकोट सेक्शन (13 किमी) दुहेरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजित आहे. गाड्या रद्द/मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत.

Advertisement

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

- यात्रा प्रारंभ दिनांक  19.12.2023 ते 28.12.2023 पर्यंत   गाडी क्र 06919   हुबळी-बिजापूर एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  19.12.2023 ते 29.12.2023 पर्यंत   गाडी क्र 06920   बिजापूर-हुबळी एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  19.12.2023 ते 28.12.2023 पर्यंत   गाडी क्र 07322   धारवाड - सोलापूर एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  20.12.2023 ते 29.12.2023 पर्यंत   गाडी क्र 07331   सोलापूर- हुबळी एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  19.12.2023 ते 28.12.2023 पर्यंत   गाडी क्र 11305   सोलापूर- होसपेठ एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  20.12.2023 ते 29.12.2023 पर्यंत   गाडी क्र 11306   होसपेठ -सोलापूर एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  19.12.2023 ते 28.12.2023 पर्यंत   गाडी क्र 07329   हुबळी-बिजापूर एक्स्प्रेस रद्द.
- यात्रा प्रारंभ दिनांक  20.12.2023 ते 29.12.2023 पर्यंत   गाडी क्र 07330   बिजापूर-हुबळी एक्स्प्रेस रद्द.

मार्ग परिवर्तन गाडी

- यात्रा प्रारंभ दिनांक 19.12.2023 आणि 26.12.2023 रोजी गाडी क्र. 16218 साई नगर शिर्डी- मैसूर एक्स्प्रेस ही व्हाया होटगी,कलबुर्गी, वाडी, गुंतकल मार्गे धावेल.

रिशेड्यूलिंग गाड्या

- यात्रा प्रारंभ दिनांक 28.12.2023 रोजी गाडी क्र. 06546 विजापूर- यशवंतपूर एक्स्प्रेस ही विजापूर रेल्वे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 60 मिनिट उशिरा सुटणार.

- यात्रा प्रारंभ दिनांक 19.12.2023 ते 26.12.2023 रोजी गाडी क्र. 11140 होसपेठ -सोलापूर एक्स्प्रेस ही होसपेठ रेल्वे स्थानकावरून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 30 मिनिट उशिरा सुटणार.

वरील गाड्यांची नोंद घ्यावी आणि प्रवाश्यांची आपला प्रवास सुनिश्चित करावा.

Advertisement
Tags :

.