आरसीयु अॅथलेटिक्स स्पर्धेत सात नवे विक्रम
बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडांगणावर राणी चन्नम्मा विद्यापीठ आयोजित नवव्या आंतर महाविद्यालयीन मुला-मुलींच्या अॅथलेटिक क्रीडास्पर्धेत लिंगराज कॉलेजच्या भूषण पाटील व वैभवी बुद्रुक यांनी जलद धावपटूसह नवा स्पर्धा विक्रम केला. आतापर्यंत सात नव्या विक्रमांची नोंद झाली आहे.
जिल्हा क्रीडांगणावरती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आरसीयूचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, चन्नम्मा विद्यापीठाचे रजिस्टर संतोष कामगौडा, निवृत्त निर्देशक जी. एन. पाटील, उमेश कलघटगी, एस. सी. पाटील, डॉ. कावेरी एच. एम., सुंदर राज आरस, डॉ. रवी गोला, जगदीश गस्ती, संतोष हारगोल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित महाविद्यालयाच्या संघांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. राष्ट्रीय क्रीडापटू वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक, भालाफेकपटू शशांक पाटील, श्रीनाथ दळवी या खेळाडूंनी मैदानावरती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपुर्द केली. काव्या बडिगेरने उपस्थित खेळाडूंना शपथ देवविली. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 60 आंतरमहाविद्यालयातून 650 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. क्रीडा निर्देशक डॉ. सी. रामराव, डॉ. एन. रामकृष्ण, डॉ. मधुकर देसाई, व्ही. एच. कलादगे, आर. के. फडतरे, उमेश भट, शंकर कोलकार, सुरज पाटील, रिचाराव आदी उपस्थित होते.
पुरुषांच्या गटात दहा हजार मी. धावण्याच्या शर्यतीत विजय सावतकरने 31 मिनिटे 14.6 सेकंद इतका कालावधीत घेत नवा विक्रम नोंदविला. यापूर्वी 2015 मुधोळ गोकाकच्या साईदप्पा मागेरीने नोंदविलेला 33.1 हा विक्रम मोडीत काढला. तर मुलींच्या गटात एसएस आर्टस कॉलेज संकेश्वरच्या प्रिया पाटीलने 42.9 मिनिटे इतका वेळ घेत नवा विक्रम नोंदविला. तिने पुजा पाटील हिचा यापूर्वीचा 42.19 हा विक्रम मोडीत काढला.
100 मी. धावण्याच्या शर्यतीत पुऊषाच्या गटात भूषण पाटीलने 10.57 सेकंद इतका अवधी घेत नवा स्पर्धा विक्रम केला. 2015 साली गोकाक येथे झालेल्या स्पर्धेत शुभम भिसेने नोंदविलेला 11.3 सेंकदाचा स्पर्धा विक्रम त्याने मोडीत काढला.
महिलांच्या गटात लिंगराज कॉलेजच्या वैभवी बुद्रुक हिने 12.19 सेकंद इतका अवधी घेत नवा स्पर्धा विक्रम करताना 2014 साली रायबाग येथे झालेल्या स्पर्धेतील लक्ष्मी राधमंजीने नोंदविलेला 13.9 सेकंदाचा विक्रम मागे टाकला.
400 मी. अडथळा शर्यतीत लिंगराज कॉलेजच्या अपूर्वा नाईकने 1 मिनिट 2. 30 सेकंदाचा कालावधी घेत नवा स्पर्धा विक्रम करताना 2022 साली विजयपूर येथे गोगटे कॉलेजच्या श्रावणी भाटेने नोंदविलेल्या 1 मिनिट 9.90 सेकंदाचा विक्रम मोडीत काढला.
महिलांच्या गोळाफेकमध्ये जेईएस श्री. के. ए. लोकापूर कॉलेज अथणीच्या दीपा कुपनीने 9.55 मी. अंतर नेंदवित नवा स्पर्धा विक्रम करताना 2018 साली बिळगी येथे काकतकर कॉलेजच्या स्नेहल पाटील हिने नोंदविलेला 9.07 मी. चा विक्रम मागे टाकला.
400 मी. अडथळा शर्यतीत लिंगराज कॉलेजच्या भूषण पाटीलने 52.03 सेंकद इतका अवधी घेत नवा स्पर्धा विक्रम केला. त्याने 2018 साली बिळगी येथे लिंगराज कॉलेजच्या अमरनाथ डुक्करवाडकरने 56.47 सेंकदाचा नोंदविलेला विक्रम मोडीत काढला.
5 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत एस एस आर्ट्स कॉलेज संकेश्वरच्या प्रिया पाटील व लिंगराज कॉलेजच्या विजय सावरतकर यांनी सलग दुसरे सुवर्णपदक मिळविले. पुऊषांच्या गटात दहा हजार मी. धावण्याच्या शर्यतीत विजय सावतरकरने 31 मिनिट 14.6 सेकंदाचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रर्मासह 2015 साली मुधोळ गोकाकच्या साईदप्पा मागेरीने नोंदविलेल्या 33 मिनिट 1.9 सेकंदाचा विक्रम मागे टाकला.
मुलींच्या गटात एस. एस. आर्ट्स कॉलेज अँड टीपी सायन्स इन्स्टिट्यूट संकेश्वर कॉलेजच्या प्रिया पाटीलने 42 मिनिटे 9.60 सेकंद इतका अवधी घेत नवा विक्रम नोंदविला. तिने 2018 बेळगी येथे पूजा पाटीलने 42 मिनिट 19.44 सेकंद नोंदविलेला विक्रम मागे टाकला.