महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उत्तर प्रदेशात पावसामुळे दिवसभरात सात बळी

07:00 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानसह 16 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

देशात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस सुरू आहे. उत्तर प्रदेशातील 10 जिल्ह्यांतील 80 हून अधिक गावे पुराच्या विळख्यात आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंतच्या 24 तासात पावसामुळे झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. बलियामधील गंगा, बाराबंकीमधील घाघरा, सिद्धार्थनगरमधील राप्ती आणि गोंडामधील क्वानो नदी धोक्मयाच्या चिन्हावरून वाहत आहे. राजस्थानमध्येही मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बुधवारी जयपूर, भरतपूर, कोटा, अजमेर आणि उदयपूर विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये 2 इंचाहून अधिक पाऊस झाला. पुढील आठवडाभर राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने 23 ऑगस्ट रोजी 19 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, ओडिशा, अऊणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक किनारपट्टी  आणि कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article