For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे सात बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकसाठी पात्र

06:09 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचे सात बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकसाठी पात्र
Advertisement

मानांकनानुसार मिळाला प्रवेश, सिंधू, प्रणॉय, लक्ष्य सेनचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या सात बॅडमिंटनपटूंनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी अधिकृतपणे पात्रता मिळविली आहे.  ऑलिम्पिक गेम्स क्वालिफिकेशन रँकिंगच्या आधारे विविध गटामध्ये त्यांना ही पात्रता मिळाली आहे. या माजी वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूचाही समावेश आहे.

Advertisement

पीव्ही सिंधू व पुरुष एकेरीचे प्रमुख खेळाडू एचएस प्रणॉय व लक्ष्य सेन यांनी याआधीच पात्रता मिळविली होती. त्याची औपचारिकता सोमवारी पूर्ण करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनने यासाठी 29 एप्रिल ही शेवटची तारीख दिली होती. त्यांच्या निकषानुसार, पुरुष व महिला एकेरीतील अव्वल 16 खेळाडूंना ऑलिम्पिक गेम्स क्वालिफिकेशन रँकिंगच्या आधारावर ऑलिम्पिकला थेट पात्रता देण्यात येते. माजी वर्ल्ड चॅम्पियन व ऑलिम्पिकमध्ये रौप्य व कांस्य मिळविणारी सिंधू 12 तर प्रणॉय व सेन अनुक्रमे नवव्या व 13 व्या स्थानावर राहिले.

ऑलिम्पिक क्वालिफिकेशन सायकलनुसार पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी पात्रता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून भारताला त्यांच्याकडून पदक मिळण्याची अपेक्षा आहे. महिला दुहेरीत तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा 13 व्या क्रमांकावर असल्याने त्यांना ऑलिम्पिक पात्रता मिळाली. पण त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांची संधी मात्र हुकली

Advertisement
Tags :

.