महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट परिसरात सात जनावरे घेतली ताब्यात

09:32 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला होता. ती जनावरे अनेकांच्या घरामध्ये देखील शिरत होती. याचबरोबर उद्यानामध्ये जाऊन नुकसान करत होते. रस्त्यांवर ठाण मांडल्याने वाहतुकीची कोंडी देखील होत होती. त्यामुळे त्या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या पथकाने सात गायी पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेमध्ये करण्यात आली आहे.

Advertisement

कॅन्टोन्मेंट परिसरात अनेक जण जनावरे मोकाटच सोडत आहेत. विशेष करून गायी, बैल यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ही जनावरे काही ठिकाणी कळप करून थांबत आहेत. त्यामुळे वाहन चालकांना ये-जा करणे अवघड जात होते. महत्त्वाचे म्हणजे अचानकपणे घरामध्ये शिरणे, त्याचबरोबर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत होती. त्यानुसार ही जनावरे पकडण्यात आली आहेत.

Advertisement

श्रीनगर येथील गोशाळेमध्ये तब्बल 23 जनावरे सध्या असून त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याची माहिती राजू संकन्नावर यांनी दिली आहे. संबंधित मालकांना जनावरे परत करताना त्यांच्याकडून दंड आकारला जात आहे. दंड आकारून ती जनावरे त्यांच्या ताब्यात देण्यात येत असतात. सध्या 23 जनावरे गोशाळेमध्ये आहेत. संबंधित मालकांनी ओळख पटविल्यानंतर त्यांना ती जनावरे देण्यात येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article