कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्लॅटची चावी बुटात ठेवणे पडले महागात

10:22 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आझमनगरमध्ये साडेसात लाखांची चोरी

Advertisement

बेळगाव : आपल्या दरवाजाला कुलूप लावून घराबाहेर पडताना चावी बुटांच्या कपाटात ठेवून जाण्याची अनेकांना सवय असते. काहीवेळा ही सवय महागात पडते. बुटामध्ये ठेवलेल्या चावीने फ्लॅटचे कुलूप उघडून चोरट्यांनी सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आझमनगर येथे घडली आहे. यासंबंधी उंबरान अब्दुलसत्तार चांदवाले (वय 59) राहणार मूनलाईट अपार्टमेंट, आठवा क्रॉस, आझमनगर यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मंगळवार दि. 22 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी 112 ग्रॅम सोने, 9 ग्रॅम चांदी, 60 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख 41 हजार 495 रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे.

Advertisement

मंगळवारी सकाळी 9 वाजता चौथ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटला कुलूप लावून चावी बुटांमध्ये लपवून ठेवत उंबरान व त्यांचे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी वीरभद्रनगर येथील नातेवाईकांच्या घरी गेले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. चावी जिथे ठेवली होती तिथेच होती. चावीने फ्लॅटचा दरवाजा उघडून रात्री सर्व जण झोपी गेले. बुधवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता तिजोरी उघडल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गेल्या पंधरवड्यात स्वतंत्र घरांबरोबरच बंद फ्लॅटमध्येही चोऱ्या वाढल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article