महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेसा फुटबॉल अकादमी.....प्रोफेशनल फुटबॉलपटू बनविण्याची पंढरी

07:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेसा फुटबॉल अकादमीने (एसएफए) महत्वपूर्ण टप्पा गाठलेल्या 2023-24च्या रोमांचक फुटबॉल हंगामानंतर, अकादमी आता 2024-25च्या अधिक महत्वाकांक्षी फुटबॉल हंगामासाठी तयारी करीत आहे. एसएफए, हा वेदांता सेसा गोवाचा प्रमुख सीएसआर उपक्रम असून भारतातील फुटबॉल प्रतिभेचे पोषण करणारी एक प्रमुख संस्था म्हणून अकादमीने आपला नेहमीच वधारणारा दर्जा कायम ठेवला आहे. एसएफएने गोव्याच्या वेगळ्या अनोख्या ओळखीसह, गोव्यात फुटबॉलच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्याच्या त्यांच्या वचनबद्धेत स्थिरता ठेवली आहे राज्यातील इच्छुक फुटबॉलपटूंसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी अकादमी समर्पित आहे. तसेच शक्य होईल तितक्या स्थानिक मुलां-मुलींना फायदा मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

Advertisement

आगामी हंगामाच्या अपेक्षेत, एसएफएचे लक्ष त्यांचे सामर्थ वाढविण्यावर तसेच अंतर भरून काढण्यावर आहे. एसएफए मधील ‘सपोर्ट स्टाफ’नीं कुशलतेने मुख्य संघ एकत्र केले आहेत, जे प्रतिभेच्या शोधात आहेत. या प्रयत्नांची रचना केवळ आधीचा दर्जा राखण्यासाठीच नाही, तर अकादमीची स्थिती उंचावण्यासाठी देखील केली गेली आहे, ज्यामुळे पुढील हंगामात आणखी यश मिळेल. या प्रक्रियेचा भाग म्हणून एसएफएमध्ये नवीन फुटबॉलपटूंच्या प्रवेशसाठी दिड महिन्याच्या कालावधीत चाचण्या घेण्यात आल्या, ज्यामध्ये गोव्यातील आणि परराज्यातील 500हून अधिक इच्छुक खेळाडूंना आकर्षित केले गेले. या चाचण्यांमुळे तरूण प्रतिभांना एसएफएच्या प्रतिष्ठित संघांपैकी एकामध्ये स्थान मिळविण्याची संधी मिळाली, ज्यात वरिष्ठ पुरूष संघ, 13, 15 व 19 वर्षांखालील संघांचा समावेश आहे. चाचणीदरम्यान एसएफएसाठी चांगली स्पर्धा झाली. एसएफएच्या ‘ब्रेक आऊट सीझन’ आणि आय-लीग 3 मधील प्रवेशामुळे हा उत्साह निर्माण झाला. मागील वर्षाच्या तुलनेत या प्रतिसादामध्ये 7 ते 10 टक्के वाढ झाली.

Advertisement

‘या वर्षीच्या चाचणी दरम्यान पाहिलेल्या प्रतिभेने आम्ही रोमांचित झालो आहोत. या युवा फुटबॉलपटूंना दाखवलेली उत्कटता आणि समर्पण खरोखरच प्रेरणादायी आहे. आम्ही 2024-25 हंगामाची तयारी करत असताना, आमचे लक्ष खेळाडूंच्या कौशल्यांचा सन्मान करण्यावर आणि एसएफएच्या उत्कृष्टतेची अभिमानास्पद परंपरा टिकवून ठेवणारा, एकसंघ संघ तयार करण्यावर आहे’ असे एसएफएचे प्रमुख प्रशिक्षक चार्ल्स डायस म्हणाले. 2023-24 फुटबॉल हंगामात, गोवा प्रोफेशनल लीग 2023-24 ‘टॉप टियर’मध्ये एसएफएच्या सीनियर फुटबॉल संघाने सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होणाऱ्या आय-लीग 3 मध्ये खेळण्यासाठी स्थान मिळविले आहे. या वर्षांच्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत गोवा राज्य संघाच्या उपविजेते पदापर्यंतच्या प्रवासात, एसएफएच्या सीनियर संघातील प्रमुख खेळाडूंनीही महत्वाची भुमिका बजावली, याव्यतिरिक्त 19 वर्षांखालील फुटबॉल संघ जीएफए अंडर-19 विभाग आय-लीग 2023-24 मध्ये उपविजेता म्हणून उदयास आला. तसेच एसएफएच्या 15 व 17 वर्षांखालील संघांनी जीएफएच्या स्पर्धेत आपआपल्या विभागांमध्ये तिसरे स्थान मिळविले.

या हंगामात केलेल्या नवीन निवडींमुळे एसएफएच्या यशात आणखी भर पडेल आणि आगामी हंगामात अकादमीला मोठे यश मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. एसएफएने आपला मार्ग पुढे चालू ठेवण्यासाठी सज्ज असून एकत्रित केलेले प्रतिभावंत फुटबॉलपटू फुटबॉल प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी आणि तरूण खेळाडूंना त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी, योग्य वातावरण प्रदान करण्याप्रती एसएफएची अतुट बांधिलकी दर्शवतात. 2023-24 फुटबॉल हंगामाने आमच्यासाठी उच्च दर्जा स्थापन केलेला आहे आणि आगामी हंगामात, विशेषत: अगदी जवळ असलेल्या आय-लीग 3 सह आम्ही तो पार करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे एसएफएचे तांत्रिक संचालक गॅवीन आरावजो म्हणाले. आमच्या खेळाडूंना उच्च-स्तरीय प्रशिक्षण आणि संधी प्रदान करणे, त्यांना मैदानाबाहेर प्रगती करण्यास मदत करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांना आम्ही आमच्या नवीन संघांना खेळताना पाहण्यास उत्सुक आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, ते आम्हाला अभिमान वाटण्याजोगे खेळतील, असे आरावजो म्हणाले.

-संदीप मो. रेडकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article