महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेशनकार्ड दुरुस्तीत सर्व्हरची समस्या

10:10 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुदत वाढवून देण्याची मागणी : लाभार्थ्यांची गैरसोय : नवीन रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकारण्यास नकार

Advertisement

बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्तीची अंतिम मुदत शनिवारी असल्याने दुरुस्तीसाठी बेळगाव वन, कर्नाटक वन कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. त्यातच सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना सकाळपासूनच ताटकळत बसावे लागले. शिवाय अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्ड दुरुस्तीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्ड दुरुस्तीसाठी 31 जुलैची अंतिम मुदत दिली होती. मात्र या काळात दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने पुन्हा 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. मात्र या काळातही सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रेशन कार्ड दुरुस्तीसाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement

अंतिम मुदत असल्याने सकाळपासूनच तोबा गर्दी 

जुलै महिन्यापासून रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला चालना मिळाली होती. त्यामध्ये नावात बदल, नवीन नाव जोडणे, पत्ता बदल आणि इतर दुरुस्ती करण्यात आली. रेशनकार्ड दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे बेळगाव वन व कर्नाटक वन कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. शनिवारी दुरुस्तीची अंतिम मुदत असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच तोबा गर्दी केली होती. मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने ताटकळत बसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. अन्न व नागरी पुरवठा खात्याने नवीन रेशनकार्डसाठी अर्ज भरणी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र बेळगाव वन व कर्नाटक वनमध्ये ऑनलाईन अर्ज भरून घेतला जात नसल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांनी केल्या आहेत. लाभार्थ्यांना थातूरमातूर उत्तरे देऊन परत पाठविले जात आहे. केवळ रेशनकार्ड दुरुस्तीचे काम सुरू आहे. नवीन रेशनकार्डसाठी अर्ज स्वीकारले जात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्ड अर्जदारांना माघारी परतावे लागले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article