For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

वाई पश्चिम भागातील मुगाव येथे भिषण अपघात; दोन युवक गंभीर जखमी

01:14 PM Oct 07, 2023 IST | Kalyani Amanagi
वाई पश्चिम भागातील मुगाव येथे भिषण अपघात  दोन युवक गंभीर जखमी

पाचगणी प्रतिनिधी

Advertisement

वाई पश्चिम भागातील मुगाव येथे भिषण अपघात झाला यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. विशाल बाजीराव वाडकर, सचिन खोपडे असे जखमी झाले आहेत.मिशन हॉस्पिटल येथे उपचारास पाठवले आहे.

मुगाव येथील पुलाजवळ हा अपघात झाला आहे.या ठिकाणी रस्त्यावर मोठे गवत आल्याने समोरुन आलेली वाहने दिसत नाहीत तसेच या ठिकाणी साईट पट्या नसल्यानेही हा अपघात घडला आहे, असा आरोप चिखलीमधील ग्रामस्थ करत आहेत.कागदोपत्री फक्त साईट पट्या वाई बांधकाम विभागाने दाखवल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.या परिसरात शाळा आहे तसेच या भागातून पर्यटक रोज प्रवास करत आहेत त्यामुळे या ठिकाणी अजुन मोठे अपघात होऊ शकतात.बांधकाम विभाग या भागात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
×

.