महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘गोमूत्र’ टिप्पणीबद्दल सेंथिलकुमार यांनी मागितली माफी

06:11 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेकॉर्डमधून आपले विधान काढून टाकण्याची विनंती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांच्या विधानावरून मोठा गदारोळ झाला. जोरदार गदारोळानंतर द्रमुक खासदाराने लोकसभेत दिलेल्या आपल्या विधानाबद्दल माफी मागत लोकसभेच्या रेकॉर्डमधून आपले विधान काढून टाकण्याची विनंती केली.

द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार एस यांनी आपल्या ‘गोमूत्र’ टिप्पणीबद्दल खेद व्यक्त करत वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहेत. हिंदी हार्टलँड राज्यांविऊद्धच्या गोमूत्र टिप्पणीवर माफी मागताना त्यांनी आपण केलेले विधान नकळत झालेले असून जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी ते परत घेतो, असे  सांगितले. मी नकळतपणे केलेल्या विधानामुळे सदस्यांच्या आणि लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी ते परत घेऊ इच्छितो. मी ते शब्द हटवण्याची विनंती करतो. त्याबद्दल मला खेद वाटतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

अनुराग ठाकूर यांनी साधला निशाणा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन सेंथिलकुमार तसेच काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडीच्या सर्व पक्षांवर निशाणा साधला. या लोकांची विचारसरणी हिंदू, हिंदी आणि सनातन धर्माची अधोगती आहे. हे लोक देशाची संस्कृती नष्ट करण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या वादग्रस्त टिप्पणीवर राहुल गांधींच्या मौनावर प्रश्न उपस्थित करत ‘राहुल गांधी गप्प का आहेत?’ अशी विचारणाही केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article