महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेंथिल बालाजी यांना मिळू शकला नाही दिलासा

05:52 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

4 डिसेंबरपर्यंत वाढली कोठडी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

तामिळनाडूतील एका न्यायालयाने बुधवारी राज्याचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांची कोठडी 4 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. द्रमुक नेत्याल जून महिन्यात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुख्य सत्र न्यायाधीश एस. अल्ली यांच्यासमोर बालाजी यांना एका शासकीय मल्टीसुपर स्पेशियलिटी रुग्णालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आले. तर सुनावणीवेळी बालाजी यांच्याकडून दाखल याचिकेवर ईडीकडून प्रत्युत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.

तपासादरम्यान  जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या प्रति सादर करण्याचा निर्देश देण्याची मागणी बालाजी यांच्याकडून याचिकेद्वारे करण्यात आली होती. याप्रकरणी संबंधित सर्व दस्तऐवज यापूर्वीच न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. तसेच आरोपीलाही सोपविण्यात आले आहेत असे ईडीच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले. यानंतर न्यायाधीशांनी बालाजी यांच्याकडून दाखल याचिकेवर 4 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.

नोकरीच्या बदल्यात रोख रक्कम स्वीकारण्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने बालाजी यांना अटक केली होती. मागील अण्णाद्रमुक शासनकाळात परिवहन मंत्री असताना बालाजी यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article