अनोळखी नंबरवर पाठविला मेसेज अन्...
नंबर निघाला युवतीचा, प्रेयसी झाली अन् विवाह
1998 मध्ये एका डीजेने चेष्टेच्या स्वरुपात रँडम नंबरवर मेसेज पाठविला होता, यानंतर जे घडले त्याची कल्पनाच कुणी केली नव्हती. ही कहाणी डोनोवन शियर्स नावाच्या इसमाची असून त्याला 27 वर्षांपूर्वी वाढदिवशी पहिला मोबाइल फोन देण्यात आला होता. त्यावेळी फार लोकांकडे मोबाइल नव्हते. याचमुळे पहिल्यांदा मोबाइल मिळाल्याच्या आनंदात डोनोवनने काही रँडम नंबरवर हॅलो असा टेक्स्ट मेसेज पाठविला होता. 45 वर्षीय डोनोवन हा पूर्वी डीजे होता आणि आता सायबर सुरक्षा क्षेत्रात कार्यरत आहे. वयाच्या 18 व्या वर्षी मोबाइल मिळाल्यावर मी मित्रांना तो दाखवत अजब प्रकारे टेक्स्ट मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. मी पहिले चार अंक निवडले होते, जे माझ्या नंबरमधील होते, मग अखेरचे तीन अंक रँडम पद्धतीने काहीही जोडले होते. यानंतर या नंबरवर केवळ हॅलो लिहून टेक्स्ट मेसेज केला होता. मी ज्या नंबरवर मेसेज पाठविला होता, त्यातील एक नंबरच्या अखेरीस 365 असे अंक होते. हा नंबर क्रिस्टी शियर्सचा होता, जी 100 मैलापेक्षा अधिक अंतरावरील क्लीथॉर्प्स, लिंक्स येथे राहत होती. यानंतर क्रिस्टीने मला उत्तरादाखल हाय असा मेसेज पाठविला होता.
मुलीने दिला प्रतिसाद
यानंतर दोघांमधील टेक्स्ट मेसेजचे आदान-प्रदान सुरू झाले. आम्ही दिवसभर मेसेज करायचो आणि मग हे प्रमाण वाढत गेले. स्कॉटलंडमध्ये जन्मलेली क्रिस्टी हिच्याकडे अल्काटेल मोबाइल होता. आम्ही कसे दिसतो हे परस्परांना सांगायचो असे त्याने सांगितले आहे.
फोनवर संभाषण
मी स्कॉटिश असून 5 फूट 11 उंच असून सरासरी शरीरयष्टी बाळगून असल्याचे तिला सांगितले. आम्ही अधिक प्रमाणात टेक्स्ट मेसेज करत असल्याने फोनचे बिल मासिक 300 डॉलर्सपेक्षा अधिक झाले होते. याचमुळे आम्ही तेव्हा फोन करण्याचा निर्णय घेतला होता, असे डोनोवनने सांगितले.
भेटण्याचा घेतला निर्णय
फोनवर खूप बोलल्यावर डोनोवनने क्रिस्टीला कोवेंट्री येथे भेटण्यासाठी बोलाविले. क्रिस्टीने स्वत:च्या सावत्र बहिणीला याची कल्पना दिली. तेव्हा ती 18 वर्षांची होती आणि परिणामांचा विचार करत नव्हती. क्रिस्टी बसमधून प्रवास करत कोवेंट्री येथे पोहोचली. मी तिला नाइट क्लबमध्ये नेले. लवकरच आम्ही परस्परांच्या प्रेमात पडलो. 2002 साली आम्ही विवाह केला आणि आता आम्हाला दोन अपत्यं आहेत असे डोनोवनने सांगितले आहे. या दांपत्याचे नाते हे कॅमेरा फोन अद्याप वापरात नसताना सुरू झाले होते.