For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स कोसळला

06:33 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स कोसळला
Advertisement

शुक्रवारी अंतिम सत्रात सेन्सेक्स 733 अंकांनी प्रभावीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी यांच्यात विक्रीमुळे दबाव निर्माण झाला होता. यामुळे सेन्सेक्स तब्बल 733 तर निफ्टी 172 अंकांनी घसरणीत राहिल्याचे दिसून आले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांच्या समभागात मोठी विक्री राहिल्याचा दणका बाजाराला शुक्रवारी बसला आहे.

Advertisement

सकाळच्या सत्रात तेजीचा कल दिसून आला होता, मात्र अंतिम सत्रात बाजाराला तेजी राखण्यात अपयश आले. दिवसअखेर सेन्सेक्स 732.96 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 73,878.15 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 172.35 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 22,475.85 वर बंद झाला आहे.

नफा कमाईचा परिणाम 

भारतीय बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे विक्रीमुळे दबावात राहिल्याने घसरणीसह बंद झाले. शुक्रवारी सुरुवातीच्या काळात बाजारात निर्देशांकांने विक्रमी स्तर प्राप्त केला होता. मात्र अंतिम क्षणी मागील दोन आठवड्यामधील सेन्सेक्स व निफ्टी यांचा निर्देशांक हा नीचांकी पातळीवर राहिला होता.

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी एप्रिल मध्ये बाजारातून 6,300 कोटी रुपये काढले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सत्रात एफआयआयने 964 कोटी रुपयांची निव्वळ समभाग विक्री केली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर व्याजदरातील कपात राहणार असल्याची शक्यता आता नोव्हेंबरपर्यंत टळली आहे. यामुळे आगामी काळातही विदेशी गुंतवणूकदार विक्री करण्यास आपली पसंती दाखवण्याचे संकेत आहेत. येणाऱ्या आठवड्यातही हा विक्रीचा दबाव राहणार असल्याची शक्यता अधिक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यामुळे नवीन आठवड्यात गुंतवणूकदारांचा कल कोणत्या दिशेने राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे  बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.