महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स प्रथमच 80,000 च्या शिखरावर

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची ऐतिहासिक कामगिरी , निफ्टीही मजबुतीसह बंद : आशियाई बाजारामुळे फायदा

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील गुरुवारच्या सत्रात नवा विक्रम करत सेन्सेक्सने ऐतिहासिक नोंद करत 80,000 चे नवे शिखर सर केले आहे. यामध्ये बुधवारी सेन्सेक्स 80 हजाराच्या समीप पोहोचला होता परंतु त्याने दुसऱ्या दिवशीच्या सत्रात हा नवा विक्रम प्राप्त केला आहे. निफ्टीनेही आपली  भक्कम स्थिती कायम ठेवल्याचे दिसून आले. जागतिक बाजारांमध्ये आशियातील बाजारांमधील तेजीचा फायदा हा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे. तसेच दुसऱ्या ट्रेडिंगसह बाजार मजबूत राहिला.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 62.87 अंकांच्या काहीशा तेजीसोबत निर्देशांक 80,049.67 वर पोहोचत नव्या विक्रमांची नोंद केली आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 15.65 अंकांची हलकीशी तेजी प्राप्त करत निर्देशांक 24,302.15 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील मुख्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेकचे समभाग हे सर्वाधिक 2.69 टक्क्यांनी वधारले आहेत. यासह आयसीआयसीआय बँक, टाटा मोर्ट्स, सनफार्मा, टीसीएस, इन्फोसिस आणि कोटक बँक मुख्य समभाग नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग हे 2.26 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत. यासह बजाज फायनान्स, लार्सन अॅण्ड टुब्रो, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, अदानी पोर्ट्सचे समभाग हे प्रामुख्याने घसरणीत राहिले आहेत.

यामुळे आली तेजी

अभ्यासकांच्या मतानुसार अमेरिकेकडून व्याजदर कमी होणार असल्याच्या संकेताने आयटी क्षेत्रातील समभाग हे 1.1 टक्क्यांनी वधारले आहेत. कारण आयटी कंपन्या अमेरिकेतून आपला महसूलामधून महत्त्वाचा हिस्सा प्राप्त करते. यामुळे याचा फायदा हा भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना झाला आहे. जागतिक बाजारांमधील सकारात्मक संकेतामुळे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काहीशी तेजी राहिली होती. आगामी काळातील बाजाराची दिशा ही किती प्रमाणात मजबूत राहणार आहे, हे पाहणे आवश्यक असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article