गुरुवारच्या सत्रात बाजारात सेन्सेक्स मजबूत
निफ्टी 89 अंकांनी तेजीत : आयटी क्षेत्रातील समभागांची चमक
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील सलग दुसऱ्या सत्रात गुरुवारी सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत स्थिती प्राप्त करुन बंद झाल्याचे दिसून आले. यामध्ये बँकिंग क्षेत्रातील विक्रीने बाजारात तेजी राहिली होती. दिवसभरातील कामगिरीत सेन्सेक्स तब्बल 682 अंकांवर वधारलेला होता. मात्र अन्य स्थिती पाहिल्यास जागतिक पातळीवरील बाजारात नकारात्मक स्थिती राहिल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने गुरुवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 306.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 65,982.48 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 89.75 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 19,765.20 वर बंद झाला. बाजारात बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारले आहेत.
घसरणीनंतर पुन्हा तेजी ?
आशियाई बाजारात नकारात्मक कल राहिल्याच्या दरम्यान गुरुवारच्या सत्रात सकाळपासूनच घसरण राहिली. परंतु ती पुन्हा परतली आहे.
या क्षेत्रांची मजबूत स्थिती
विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांकडून भांडवलाचा प्रवाह आणि आयटी क्षेत्रातील लिलावामुळे बाजारात तेजी राहिली. अमेरिकेतील महागाई दर अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यामुळे व बॉण्डमधील घसरणीमुळे शेअर बाजारात मजबूत स्थिती राहिल्याची नोंद केली आहे. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एनटीपीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह यांच्या समभागात तेजी राहिली. अन्य कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत. जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी हे लाभात राहिले आहेत. तर जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट व हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपमधील बाजारात मिळताजुळता कल राहिला होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टीसीएस 3498
- एचसीएल टेक 1311
- टेक महिंद्रा 1206
- इन्फोसिस 1443
- बजाज फायनान्स 7365
- एनटीपीसी 252
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1571
- बजाज फिनसर्व्ह 1620
- विप्रो 396
- टाटा मोर्ट्स 680
- टायटन 3335
- सनफार्मा 1189
- टाटा स्टील 124
- एशियन पेन्ट्स 3129
- इंडसइंड बँक 1499
- अल्ट्राटेक सिमेंट 8795
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2363
- एचडीएफसी बँक 1508
- मारुती सुझुकी 10482
- कोटक महिंद्रा 1771
- हिंदुस्थान युनि 2489
- भारती एअरटेल 949
- ल्यूपिन 1193
- डाबर इंडिया 534
- बीपीसीएल 398
- झोमॅटो 121
- सीजी कझ्युमर 284
समभाग घसरलेल्या कंपन्या
- अॅक्सिस बँक 1025
- पॉवरग्रिड कॉर्प 207
- आयटीसी 438
- आयसीआयसीआय 935
- लार्सन अॅण्ड टुब्रो 3049
- जेएसडब्लू स्टील 768
- नेस्ले 24087
- स्टेट बँक 584
- कोल इंडिया 345
- वेदान्ता 238
- पीआय इंडस्ट्रीज 3689
- सिप्ला 1236
- मॅरिको 517
- ब्रिटानिया 4696