दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स अल्पशा घसरणीत
सेन्सेक्स 2 अंकांनी प्रभावीत : आयटीसी, स्टेट बँक यांचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजरात दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 2 अंकांनी घसरला आहे. तर दुसरीकडे एनएसई निफ्टी हा 1 अंकांनी तेजीत राहिल्याची नोंद केली आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये 19 समभाग वधारले तर 11 समभाग हे घसरले आहेत. मंगळवारच्या सत्रात बाजार हा दिवसभरात 300 अंकांच्या खाली कार्यरत राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बँकिंग, रियल्टी, धातू यांच्यात वरच्या स्तरावर विक्रीचा कल दिसून आला आहे. तसेच निफ्टी बँकेमध्ये 1 टक्क्यांनी घसरण राहिली. यावेळी पीएसयू बँक निर्देशांक हा 3.68 टक्क्यांनी प्रभावीत राहिला आहे. निफ्टीतील रियल्टीचा निर्देशांक 1.74 टक्क्यांनी घसरला तर धातूचा निर्देशांक जवळपास 1.50 टक्क्यांनी नुकसानीत राहिला आहे. यावेळी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 25 पैशांनी प्रभावीत होत 82.05 रुपयावर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने भारतीय बाजारामध्ये मंगळवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 2.92 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 61,761.33 वर बंद झाला आहे. तर याच्या विरुद्ध बाजूला एनएसई निफ्टी 1.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,265.95 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग 1.28 टक्क्यांनी वधारत बंद झाले. तसेच टीसीएस 1.04, अॅक्सिस बँक, 1.01, टाटा मोर्ट्स 0.91 टक्के आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांचे समभाग हे 0.88 टक्क्यांनी वधारले. यासोबतच टाटा मोर्ट्स, एचसीएल टेक, एशियन पेन्ट्स, विप्रो, टेक महिंद्रा, लार्सन अॅण्ड टुब्रो, एचडीएफसी, मारुती, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत होते. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये आयटीसी, स्टेट बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, सनफार्मा, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन आणि भारती एअरटेल यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक बाजारातील नकारात्मक घडामोडींमुळे देशातील बाजाराने आपली तेजी गमावली आहे. अमेरिकेतील महागाई दराचा आगामी आकडा कसा असेल यावर बाजाराची दिशा ठरेल.