दूरसंचार कपंन्यांवर 4 लाख कोटींचे कर्ज
‘बीएसएनएल’वर सर्वात कमी कर्ज : आर्थिक वर्ष 2024 मधील आकडेवारीमधून स्पष्ट
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या चार दूरसंचार कंपन्यांवर आर्थिक वर्ष 2024 मध्ये एकूण 4,09,905 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये सरकारी कंपनी बीएसएनएल या कंपनीवर सर्वात कमी म्हणजे 23,297 कोटींचे कर्ज असल्याची माहिती दूरसंचार राज्यमंत्री पेम्मासनी चंद्रशेखर यांनी लोकसभेमध्ये दिली आहे. यावेळी अन्य दूरसंचार कंपन्यांच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाचा आकडाही समोर आला असून तो खालील प्रमाणे आहे.
बीएसएनएलचे कर्ज का कमी?
राज्यमंत्री पेम्मासनी चंद्रशेखर यांनी माहिती देताना म्हटले की, दूरसंचार कंपनी बीएसएनएलचे कर्ज 2022 मध्ये 40,400 कोटींवर होते. मात्र सरकारने केलेल्या आर्थिक मदतीमुळे नव्याने बांधणी करण्यासाठी कंपनीला मोठा हातभार झाला. यामुळे कंपनीचे कर्ज कमी होत ते 28,092 कोटींवर राहिल्याचे दिसून आले.
सरकारने बीएसएनएलला दिलेले मदतीचे हात
वर्ष 2019 मध्ये 69,000 कोटींचे पॅकेज दिले, यामुळे बीएसएनएल व एमटीएनएलचे खर्च कमी होत गेले.nb वर्ष 2022 मध्ये 1.64 लाख कोटींचे अर्थसहाय्य केल्यामुळे यामध्ये नवीन भांडवल, कर्ज कमी करणे व ग्रामीण भागातील दूरसंचार सेवा कार्यरत ठेवण्यावर भर दिला आहे.
4-जी व 5 जी सेवांच्यासाठीही मदत
सरकारने बीएसएनएलला 4 जी व 5 जी सेवांच्यासाठी 89,000 कोटींची स्पेक्ट्रम उभारणी केली आहे.
अ.क्र. दूरसंचार कंपनी कर्ज
- व्होडाफोन-आयडिया 2.07 लाख कोटी
- भारती एअरटेल 1.25 लाख कोटी
- जिओ इन्फोकॉम 52,740 कोटी
- बीएसएनएल 23,297 कोटी