महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स-निफ्टी प्रभावीत

06:30 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये मिळता-जुळता कल

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

जागतिक पातळीवरील शेअर बाजारामध्ये मंगळवारच्या सत्रात मिळताजुळता कल राहिला होता. या घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात आयटी व ऊर्जा कंपन्यांच्या समभागांमध्ये नकारात्मक कामगिरी राहिल्याने याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारातील कामगिरीवर झाल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने भारतीय बाजारात नफा वसुली राहिल्याचा परिणाम हा बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांच्या कामगिरीवर झाला.

दोन दिवसांच्या तेजीचा प्रवास अखेर मंगळवारी थांबला. यामध्ये मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 188.50 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.25 टक्क्यांसोबत 74,482.78 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 38.55 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 22,604.85 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि कोटक बँक यांचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग प्रामुख्याने वधारुन बंद झाले आहेत.

जागतिक बाजारांची स्थिती 

आशियातील बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा सियोल, टोकीओ आणि हाँगकाँग यांचे निर्देशांक हे सकारात्मक राहिले आहेत. तर चीनचा शांघाय कम्पोझिट  घसरणीत राहिला होता. युरोपीय बाजारात सर्वाधिक घसरण होती. मात्र वॉल स्ट्रीट सोमवारी तेजीसह बंद झाला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

या दरम्यान ब्रेंट क्रूड या कच्च्या तेलाच्या किंमती 0.21 टक्क्यांनी वधारुन 88.59 अमेरिकन डॉलर प्रति बॅरेलवर राहिल्या आहेत. आजच्या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 मे रोजी भारतीय शेअर बाजारांमधील व्यवहार बंद राहणार आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article