For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढ-उतारांमध्ये सेन्सेक्स-निफ्टी घसरले

06:38 AM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
चढ उतारांमध्ये सेन्सेक्स निफ्टी घसरले
Advertisement

जागतिक बाजारांमधील संमिश्र स्थितीमुळे बाजार स्थिरावत बंद

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय भांडवली बाजारात जागतिक बाजारातील संमिश्र स्थितीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक काहीशा घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पीएसयू बँकांच्या समभाग आणि एफएमसीजी समभागांध्येही विक्री दिसून आली. पीएसयू बँकांनी बाजारातील घसरणीला संतुलित केले.

Advertisement

दरम्यान वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ होत राहिली तर आयटी समभागांमध्ये घसरण झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन एच-1बी व्हिसा नियमांमध्ये बदल केल्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. याच वेळी, गुंतवणूकदार अमेरिकेशी व्यापार करारासाठी वाटाघाटी करण्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. 50 टक्के शुल्क लादल्यानंतर ट्रम्प प्रशासनाचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

बीएसई सेन्सेक्स 82,147.37 वर जवळजवळ स्थिर उघडला. अखेर 57.87 अंकांनी किंवा 0.07 टक्क्यांनी किंचित घसरणीसह 82,102.10 वर बंद झाला. तसेच, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टीदेखील जवळजवळ स्थिरपणे उघडला. अंतिमक्षणी निफ्टी 32.85 अंकांनी घसरून 25,169.50 वर बंद झाला.

एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर म्हणाले, ‘दिवसाच्या नीचांकी पातळीवरून इक्विटी मार्केटमध्ये तेजी आली. गुंतवणूकदारांनी देशांतर्गत मागणीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली. अलीकडील जीएसटी-संबंधित सुधारणांमुळे याला पाठिंबा मिळाला. आगामी भारत-अमेरिका व्यापार कराराच्या अपेक्षांमुळे बाजारातील भावना आणखी मजबूत झाल्या.’

निफ्टी कंपन्यांमध्ये, ट्रेंट, टेक महिंद्रा, एसबीआय लाईफ, अल्ट्राटेक सिमेंट, एचयूएल, एचडीएफसी लाईफ, नेस्ले, एशियन पेंट्स, सिप्ला, ग्रासिम, इटर्नल आणि हिरो मोटोकॉर्पचे समभाग घसरले. यामध्ये 2.5 टक्के घसरण झाली.

व्यापक बाजारात, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.3 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप 250 निर्देशांक 0.5 टक्के घसरला. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सर्वाधिक घसरणीचा दर ठरला.

जागतिक बाजारपेठ

मंगळवारी आशियाई बाजारपेठेत वाढ दिसून आली. वॉल स्ट्रीटवरील टेक स्टॉक्सच्या ताकदीमुळे हे घडले. शेवटच्या अहवालानुसार, जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.99 टक्क्यांनी वाढला. तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वाढला. तथापि, हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.32 टक्क्यांनी घसरला.

Advertisement
Tags :

.