For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी प्रभावीत

06:21 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी प्रभावीत
Advertisement

नफा वसुलीच्या कारणास्तव प्राप्त तेजी बाजाराने गमावली

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये लार्जकॅपमधील नफा कमाईचा वेग वाढल्याने देशातील बाजाराने प्राप्त केलेली सकाळच्या सत्रातील तेजी अंतिमक्षणी मात्र गमावली असल्याचे दिसून आले. यामध्ये काहीकाळ बाजारात सेन्सेक्स 75,000 अंकांच्या वर जात 75,124 वर नवा विक्रम प्राप्त केला होता. परंतु हे यश कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले.

Advertisement

जागतिक पातळीवर मंगळवारी मिळताजुळता कल राहिला होता. मात्र दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 58.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 74,683.70 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजार 23.55 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 22,642.75 वर बंद झाला आहे. दरम्यान बाजारात बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक हे 0.47 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.

मजबूत परतावा देणाऱ्या कंपन्यांची स्थिती

मंगळवारी बाजारात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये इन्फोसिस, अॅक्सिस बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग हे तेजीत राहिले आहेत. तर अन्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, टाटा कंसलटन्सी सर्व्हिसेस, विप्रो आणि एशियन पेन्ट्स यांचे निर्देशांक नुकसानीत राहिले होते.

बाजाराची सुरुवात ही तेजीसोबत झाली होती, मात्र अंतिमक्षणी बाजार नुकसानीसोबत बंद झाला. निफ्टीतील मिडकॅपमध्ये 100, बीएसईमधील स्मॉलकॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी औषध आणि निफ्टी एफएमसीजी यांचे निर्देशांक नुकसानीत राहिले होते.

सेन्सेक्स व निफ्टी यांच्या कामगिरीमध्ये मंगळवारी अपोलो हॉस्पिटल, हिंडाल्को, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयशर मोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह आणि ग्रासीम इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीसह बंद झाले.

Advertisement
Tags :

.