महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद

06:21 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा दिवसांच्या प्रवासानंतर तेजी परतली : विधानसभा निकालांचा प्रभाव

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी तेजीसह बाजार बंद झाला आहे. मागील सहा दिवस बाजारात राहिलेल्या घसणीला पूर्णविराम मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून इराण व इस्रायल यांच्यामधील तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि एफपीआयकडून समभागांमधील मजबूत विक्री यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक सावरले आहेत.

दुसऱ्या बाजूला हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणीच्या दरम्यान सत्ताधारी पार्टी भाजपला बहूमताचा कल मिळत गेल्याचा फायदा बाजाराला होत गेला आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते व काही अहवालामधून सांगितलेल्या विरुद्ध निकालाचे चित्र निर्माण झाल्याचा लाभ हा भारतीय बाजारात राहिला.

सलगच्या सुरु असणाऱ्या शेअर बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गुंतवणूकदारांनी मजबूत विक्री केली. यामुळे बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 584.81 अंकांनी मजबूत होत 0.72 टक्क्यांसोबत निर्देशांक 81,634.81 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 217.40अंकांनी वधारुन निर्देशांक 25,013.15 वर बंद झाला आहे.

गेले काही दिवस एफपीआय चीनच्या समभागामध्ये गुंतवणूकदार सावध भूमिका घेत होते. मात्र चीनमधील सरकारी प्रोत्साहनाच्या बळावर बाजार वधारल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल खरेदीकडे राहिला.

13 मुख्य क्षेत्रांमध्ये 12 तेजीत राहिले. निफ्टीत फायनान्शिअल सर्व्हिसचे समभाग 1 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा, निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी ऑईल अॅण्ड गॅस क्षेत्रांमध्ये 1.27 टक्क्यांची तेजी राहिली. विविध क्षेत्रांपैकी धातू क्षेत्रात घसरण राहिली होती.

बीइएल, अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोर्टस, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज ऑटो, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल, रिलायन्स, एचडीएफसी बँक यांचे समभाग 2 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एसबीआय लाईफ, टाटा स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फिनसर्व्ह,  हिंडाल्को, बजाज फायनान्स, विप्रो, हिंदुस्थान युनि, आयटीसी, टाटा मोटर्स, पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article