तिसऱ्या सत्रात सेन्सेक्सची 539.83 अंकांवर झेप
अमेरिका-जपान करारामुळे बाजारात भावनिक उत्साह
मुंबई :
भारतीय भांडवली बाजार चालू आठवड्यातील तिसऱ्या सत्रात बुधवारी मागील घसरणीला पूर्ण विराम दिला. अमेरिका आणि जपानमधील उच्चपातळीवरील व्यापारी करारामुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यापारी चर्चेसाठी आशा निर्माण झाली आहे. याचाच परिणाम आशियाई बाजारा तेजीचे वातावरण राहिले म्हणून बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 539.83 अंकांनी वधारुन निर्देशांक 82,726.64 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 159.00 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 25,219.90 वर बंद झाला आहे. बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 82,186 कोटी रुपयांनी वाढून 460.37 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
दिवसाच्या उत्तरार्धात ईयु आणि युएस याच्यात व्यापार चर्चेच्या नवीन फेरीपूर्वी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. यामुळे, जपानच्या बाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा एमएससीआयचा सर्वात विस्तृत निर्देशांक 1.4 टक्क्यांवर वधारला. वित्तीय आणि माहिती तंत्रज्ञान समभागांमध्ये अनुक्रमे 0.8 टक्के आणि 0.3 टक्केची भर पडली, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेने सलग तिस्रया सत्रात त्यांच्या उत्पन्नानंतरच्या वाढीचा विस्तार केला, 0.9 टक्के आणि 1 टक्के वाढ झाली.
मिड-कॅप समभागांमध्ये 0.3 टक्के वाढ झाली, तर व्यापक स्मॉल-कॅप विभागात फारसा बदल झाला नाही. लोढा डेव्हलपर्स आणि ओबेरॉय रिअॅलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्राचा निर्देशांक 2.6 टक्के घसरला, जो मोठ्या ब्लॉक डीलनंतर 7.5 टक्के आणि 3.1 टक्के घसरला. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्समध्ये 2.1 टक्के घसरण झाली, तर डॉ. रे•ाrज लॅबोरेटरीजमध्ये तिमाही निकालांपूर्वी 0.6 टक्केची वाढ झाली.
तज्ञांच्या नजरेतून
भारतीय इक्विटी बाजाराने आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीच्या नफ्यात संमिश्र सुरुवात असूनही आणि अमेरिका-जपान व्यापार कराराच्या सभोवतालच्या आशावादामुळे सकारात्मक जागतिक संकेत असूनही, भावनांना पाठिंबा दिला आहे, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. निफ्टीत सर्वाधिक तेजीत टाटा मोटर्सचे समभाग राहिले आहेत. यामध्ये श्रीराम फायनान्स 2.18 टक्क्यांनी तेजीत राहिले, यासोबतच भारतीय एअरटेल, अपोलो हॉस्पिटल आणि बजाज फायनान्स यांचीही चमक कायम राहिली होती. दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान युनिलिव्हवर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि ग्रासिम यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.