तिसऱया दिवशी सेन्सेक्सची 630 अंकांची उसळी
निफ्टी 16,500 अंकांवर : जागतिक संकेताचे परिणाम
वृत्तसंस्था /मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय भांडवली बाजारात सलगचे चौथे सत्र तेजीसोबत राहिले. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्सने 630 अंकांची उसळी प्राप्त करत बंद झाल्याचे दिसून आले. जागतिक बाजारांमधील सकारात्मक कल राहिल्याने आयटी व ऊर्जा क्षेत्रातील समभागांमधील लिलावामुळे देशातील शेअर बाजाराला समर्थन मिळाले आहे.
बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टाटा कंसल्टेन्सी सर्व्हिसेज (टीसीएस) यांच्या समभागातील खरेदीमुळे व विदेशी संस्थांच्या गुंतवणूकादारांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे बाजाराची स्थिती मजबूत राहिली होती.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 629.91 अंकांनी मजबूत होत 1.15 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 55,397.53 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 180.30 अंकांनी मजबूत होत 16,520.85 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील समभागांमध्ये टेक महिंद्रा, टाटा कंसल्टेन्सी सर्व्हिसेज, एचसीएल टेक्नालॉजी, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, विप्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग प्रामुख्याने लाभात राहिले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, सनफार्मा, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले आहेत.
अन्य घडामोडी....
सरकारच्या पेट्रोल व डिझेल आणि विमान इंधनावर अप्रत्याक्षित लाभाचा कर कमी केल्यामुळे तेलाचा शोध आणि उत्पादन तसेच रिफायनरीशी संबंधीत असणाऱया कंपन्यांच्या समभागांची बुधवारी मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली होती. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 2.47 टक्क्यांनी तर ओएनजीसीचे समभाग चार टक्क्यांनी वधारल्याची नेंद करण्यात आली.
जागतिक पातळीवरील स्थितीमध्ये आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे लाभासह बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव नरमाईचे राहिल्याने सरकारने बुधवारी पेट्रोल व डिझेल आणि विमान इंधन तसेच कच्च्या तेलावरील अप्रत्यक्षपणे लागू होणाऱया करात कपात करण्यात आली आहे. याचाही फायदा भारतीय बाजाराला झाला आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 1.17 टक्क्यांनी घसरुन 106.1 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टेक महिंद्रा....... 1046
- एचसीएल टेक..... 917
- टीसीएस.......... 3163
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2501
- स्टेट बँक............. 508
- इन्फोसिस........ 1514
- विप्रो................. 412
- हिंदुस्थान युनि.. 2605
- टायटन............ 2270
- एचडीएफसी बँक 1365
- आयटीसी........... 298
- नेस्ले.............. 18602
- इंडसइंड बँक....... 878
- टाटा स्टील......... 928
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1740
- ऍक्सिस बँक........ 705
- एचडीएफसी..... 2225
- मारुती सुझुकी... 8745
- आयसीआयसीआय 782
- डॉ.रेड्डीज लॅब.... 4457
- अल्ट्राटेक सिमेंट. 6090
- बजाज फायनान्स 6070
- वेदान्ता.............. 253
- सिप्ला............... 981
- डाबर इंडिया...... 558
- अशोक लेलँड....... 148
- मॅरिको............... 513
- ब्रिटानिया........ 3821
- मॅक्स फायनान्स.. 836
समभाग घसलेल्या कंपन्या
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1164
- सनफार्मा........... 867
- कोटक महिंद्रा.... 1824
- भारती एअरटेल... 670
- पॉवरग्रिड कॉर्प.... 209
- बजाज फिनसर्व्ह 12417
- एशियन पेन्ट्स.. 3011
- एनटीपीसी......... 150
- हॅवेल्स इंडिया... 1223
- एचपीसीएल....... 234
- बंधन बँक........... 281
- फेडरल बँक 105