For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चढउतारामध्ये सेन्सेक्स तेजीत, निफ्टी घसरणीत

06:16 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
चढउतारामध्ये सेन्सेक्स तेजीत  निफ्टी घसरणीत
Advertisement

नफा वसुलीचा प्रभाव : एचडीएफसीचे समभाग मजबूत

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारात तिसऱ्या दिवशीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स तेजीत राहिला होता, तर निफ्टी मात्र प्रभावीत होत बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये झालेल्या नफावसुलीमुळे बाजाराचा प्रवास काहीसा दबावात राहिल्याने दिवसभरात चढउताराची स्थिती होती.

Advertisement

मुख्य कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 0.05 टक्क्यांसोबत 36.45 अंकांनी वधारुन निर्देशांक 77,337.59 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 41.90 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 23,516.00 वर बंद झाला आहे.

मुख्य कंपन्यांमध्ये बुधवारी सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग हे सर्वाधिक 3.06 टक्क्यांनी वधारुन बंद झाला. तर सोबत अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक, इन्फोसिस यांचे समभाग हे प्रामुख्याने वधारले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये  टायटनचे समभाग हे सर्वाधिक 3.46 टक्क्यांनी नुकसानीत राहिले होते. यासह लार्सन अॅण्ड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

बुधवारच्या सत्रात बाजारात कंझ्युमर गुड्स कॅपिटल आणि एनर्जीमध्ये समभागात नफावसुलीने बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील समभागात तेजी राहिली होती. निफ्टी 50 आणि सेन्सेक्सने आज चौथ्या सत्रात नवीन विक्रम प्राप्त केला आहे. अमेरिकन रिटेल विक्री डाटा सादर झाल्यानंतर बँकिंग व आयटी क्षेत्रातील समभाग वधारले आहेत.

सलग पाचव्या सत्रात सेन्सेक्स तेजीत

सलगच्या पाच सत्रात बीएसई सेन्सेक्स हा तेजीत राहिला आहे. यासोबतच त्याने नवा विक्रम प्राप्त करत यशस्वी कामगिरी केली आहे. यामुळे आगामी काळातही यामध्ये चमक राहणार असल्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. अमेरिकेतील डोव्ह जोन्स घसरणीत तर नॅसडॅक तेजीत होता. आशियाई बाजारात तेजी होती.

Advertisement
Tags :

.