महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स 1628 अंकांनी कोसळला

06:58 AM Jan 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुंतवणूकदारांचे 4.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सची मोठी पडझड झाल्याचे दिसून आले. जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करणार नसल्याच्या वॉल स्ट्रीटच्या अंदाजाने आणि  निर्देशांकांमध्ये मोठा हिस्सा ठेवणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या समभागात मोठी घसरण झाल्याचा फटका गुंतवणूकदारांनाही बसला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने प्रवास करणाऱ्या बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1628.01 अंकांनी कोसळून निर्देशांक 71,500.76 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 460.35 अंकांच्या पडझडीसह निर्देशांक 21,571.95 वर बंद झाला आहे.

बुधवारी बाजारातील विविध स्थितीचा आढावा घेतल्यास यामध्ये लार्जकॅप समभागांमध्ये एचडीएफसी बँकेचे समभाग हे सर्वाधिक घसरणीत राहिले होते. तिसऱ्या तिमाहीमधील नफा वधारुन 16,373 कोटी रुपयावर पोहोचला असून बँकेचे समभाग हे 8.46 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास टाटा स्टील, कोटक बँक, अॅक्सिस  बँक, आयसीआयसीआय बँक, विप्रो, हिंडाल्को, टाटा मोटर्स, बजाज फिनसर्व्ह आणि बजाज ऑटो यांचे समभाग घसरणीत राहिले.

सेन्सेक्समधील सहा कंपन्या तेजीत

दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समधील 6 कंपन्यांचे समभाग हे तेजीसह बंद झाले आहेत. फक्त एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झालेत.

गुंतवणूकदारांना 4.6 लाख कोटींचा फटका

बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य मागील सत्रात जवळपास 375 लाख कोटी रुपयांनी घटून ते 370.4 लाख कोटींवर आले आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे ट्रेडिंगच्या दरम्यान जवळपास 4.6 लाख कोटीचे नुकसान झाले आहे. देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक व बीएसईमधील मोठी हिस्सेदारी ठेवणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या समभागात तिमाही अहवालानंतर मोठ्या घसरणीची नोंद झाली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#business
Next Article